दैनिक देशोन्नती इम्पॅक्ट
पुसद (Meena Bazaar) : शहरामध्ये दरवर्षी नागरिकांचे मनोरंजन करण्याकरिता दीपावली व दसरा सणाच्या मुहूर्तावर परभणी येथील मीना बाजार संचालक हे मीना बाजार शहरांमध्ये आणत असत. यावर्षीही कारला रोडवरील एका लेआउट मध्ये सदरचा मीना बाजार भरल्या गेला होता. मात्र तो मीना बाजार वादग्रस्त ठरला, या ठिकाणी महिलांची छेडखानी, असुरक्षित असलेले झुले व मोठ्या प्रमाणात होत असलेली चिडीमारी तर या परिसरात झालेले चाकू हल्ले यामुळे हा मीना बाजार शहरांमध्ये वादग्रस्त ठरला होता.
याची गंभीर दखल घेत येथील भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष दीपक परिहार यांनी पोलीस प्रशासनाकडे प्रत्यक्ष जाऊन तक्रार केली होती. दैनिक देशोन्नतीने सातत्याने स्पॉट इन्स्पेक्शन करून वृत्त मालिका चालवली होती. कोणत्याही समाजाच्या महिला व तरुणी असो त्यांची जर छेड काढल्या जात असेल तर ते अक्षम्य आहे. संबंधित (Meena Bazaar) मीना बाजार संचालक व त्याच्या काही दलालांनी पोलीस प्रशासनाला ही हाताशी धरले होते. मात्र याच्या समाज मनावर विपरीत परिणाम होत होता दैनिक देशोन्नतीने चालवलेल्या मालिकेमुळे व शहराध्यक्ष परीहार यांनी दिलेल्या तक्रारीमुळे शेवटी या मीना बाजार संचालकाला आपल्या मीना बाजार ची दुकानदारी पुसद शहरातून हलवावी लागली हे विशेष.