परभणी/जिंतूर (Parbhani):- तालुक्यातील आघावाडी येथील तरुणाने मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांच्यावर समाजमाध्यमावर वादग्रस्त पोष्ट(Controversial post) केल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते म्हणून बोरी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तत्काळ त्या तरुणास अटक करून विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान रात्री उशिरा पर्यंत मराठा समाजातील तरुणांनी बोरी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले होते. ही घटना 26 जून रोजी रात्रीचा सुमारास घडली.
रात्री उशिरा परभणीच्या बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
राज्यात सध्या मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षणावरून(OBC reservation) आरोप प्रत्यारोप सुरू आहेत त्यातच काही राजकीय नेत्यांकडून मराठा समाज व ओबीसी समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करण्यात येत आहेत, असाच प्रकार रास्तारोको आंदोलना दरम्यान एका राजकीय पदाधिकाऱ्याचे प्रक्षोभक भाषण केले होते. याचे पडसाद समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात पहावयास मिळाले असाच प्रकार मागील तीन दिवसांपूर्वी पाचेगाव येथील अल्पवयीन मुलाने पंकजाताई मुंडे यांच्या बदल आक्षेपार्ह पोष्ट केली होती. यामुळे शहरात ताणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ही घटना ताजी असताना जिंतूर तालुक्यातील आघाववाडी येथील मोहन आघाव या तरुणाने समाजमाध्यमावर मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा फोटो मॉर्फ करून अश्लील कमेंट केली. यामुळे मराठा समाजाचा भावना तीव्र झाल्या होत्या, म्हणून तरुणांनी रात्री उशिरा बोरी पोलीस ठाणे गाठून आरोपीवर गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करण्याची मागणी लावून धरली होती. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर यांनी तत्काळ आरोपीस ताब्यात घेतले होते.
यामुळे जमाव शांत झाला यावेळी जिंतूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती,पोलीस उपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे पोलीस नाईक सिद्धेश्वर चाटे, नामदेव डूबे, राम पौळ, परसराम गायकवाड, नीलपत्रेवार जिल्हा विशेष शाखेचे पोलीस हवालदार जिया खान यांनी कोणताही अनुचित प्रकार घडूनये म्हणून चोख बंदोबस्त(arrangement) ठेवण्यात आला होता.