म्हणाल्या, अर्ज करुनही मिळेनात दीड हजार!
लातूर (Ajit Pawar) : आमच्या खात्यात पैसेच जमा झाले नाहीत, असे म्हणत मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनी (CM Ladki Bahin Yojana) लातूरमध्ये चक्क उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ताफा अडविला. दीड हजार तात्काळ मिळावेत, यासह अन्य मागण्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा ताफा अडवला. यावेळी ना. पवार यांनी त्यांच्या मागण्या समजावून घेत स्थानिक मंत्री संजय बनसोडे हे लक्ष देतील, असे आश्वासन दिले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (CM Ladki Bahin Yojana) नावावर राज्य सरकारने राज्यातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याचा घेतला असून या योजनेला लातूर जिल्ह्यातही मोठा प्रतिसाद मिळाला असून प्रशासनाकडून जवळपास दोन लाख अर्ज भरून घेण्यात आले आहेत, अद्याप अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरूच आहे. यातील कांही महिलांना सरकारने ओवाळणी म्हणून राखी पौर्णिमेला तीन हजाराचा हप्ता जमा केला, अर्ज भरलेल्या कांही महिलांना पैसेच जमा झाले नाही, आम्हाला का पैसे मिळाले नाहीत याचा जाब विचारत लातूर दौऱ्यावर आलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महिलांनी घेराव घालत प्रश्नांचा भडीमार केला, यावेळी राष्ट्रवादीचे स्थानिक नेते क्रीडामंत्री संजय बनसोडे यांना या प्रश्नांकडे लक्ष द्या, त्यांची काय मागणी आहे, शासन दरबारीं मांडा अशी सूचना अजित पवार (Ajit Pawar) यांनी केल्या.
यावेळी घरेलू कष्टकरी महिलांच्या विविध मागण्यांसाठी बहुजन महिला हक्क श्रमिक संघटनेच्यावतीने महिलांच्या हक्कासाठी लक्ष्मीताई कांबळे यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या आंदोलनाची माहिती देत कष्टकरी महिलांच्या मागण्या मान्य करावे यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना निवेदन देण्यात आले.
अरे संजय, काय करतोस तू..?
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी लातूर जिल्हा दौऱ्यावर आले असता (CM Ladki Bahin Yojana) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे न मिळालेल्या महिलांनी त्यांना विमानतळावरच घेराव घालत पैसे मिळत नाहीत, आमचे कोणी ऐकून घेत नाही, असे गार्हाणे घातले. यावर अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रशासनातील कोणी वरिष्ठ अधिकारी आजूबाजूला आहे का ते पाहिले. मात्र यावेळी जिल्हाधिकारी किंवा संबंधित विभागाचे कोणी अधिकारी दिसून आले नसल्याने ते चिडून, ‘इथे आहेत ना तुमचे मंत्री, अरे संजय तू काय करतोस रे?’ अशी नाराजी व्यक्त केली. यानंतर ना. संजय बनसोडे यांनी सदर महिलांना मी तुम्हाला लाभ मिळवून देईन, असे सांगत त्यांना बाजूला केले.