अवैध सावकारी, दस्तऐवज, कोरे धनादेश, कोरे स्टॅम्प पेपर
अमरावती (Illegal Moneylender) : जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांच्या कार्यालयात दिलीप रामलाल जयस्वाल व रोहीत दिलीप जयस्वाल राहणार वेणी गणेशपुर ता. नांदगाव खंडेश्वर हे मक्ताने घेतलेल्या शेतीचा ताबा तक्रारदारास न देता सदर व्यवहार हा सावकारीचा आहे, असे सांगतात सबब दिलीप रामलाल जयस्वाल व रोहीत दिलीप जयस्वाल अवैध सावकारी (Illegal Moneylender) करतात अशी तक्रार प्राप्त झाली होती. सदर तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अमरावती हयांनी सहायक निबंधक सहकारी संस्था नांदगाव खंडेश्वर हयांनी दीले होते.
सदर प्रकरणी सहायक निबंधक सहकारी संस्था यांनी प्राथमीक माहीती प्राप्त करुन घेतली होती. या आधारावर जिल्हा उपनिबंधक (Cooperative Department) सहकारी संस्था अमरावती यांचे आदेशान्वये नेमलेल्या दोन पथकाने पथकाने गैरअर्जदार दिलीप रामलाल जयस्वाल व रोहीत दिलीप जयस्वाल राहणार वेणी गणेशपुर ता. नांदगाव खंडेश्वर यांचे राहते घरी (Illegal Moneylender) महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 चे कलम 16 नुसार अधिकाराचा वापर करुन झडतीची कार्यवाही करण्यात आली आहे. यामध्ये आक्षेपार्ह कागदपत्रे दस्तऐवज, कोरे धनादेश, कोरे स्टॅम्प पेपर पंचासमक्ष जप्त करण्यात आलेले आहेत. सदर कागदपत्राची पडताळणी करुन सावकारी (नियमन) अधिनीमय 2014 मधील तरतुदीनुसार पुढील कारवाई प्रस्तावीत करण्यात येणार आहे.
सदर कारवाई प्रविण फडणीस विभागीय सहनिबंधक (Cooperative Department) सहकारी संस्था अमरावती हयांच्या मार्गदर्शनात, शंकर कुंभार, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अमरावती हयांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनात, व अच्युत उल्हे सहायक निबंधक (प्रशासन), स्वाती गुडधे सहायक निबंधक (प्रशासन) सुधीर मानकर सहकारी अधिकारी श्रेणी-2 अमरावती यांच्या सहकार्याने व नियोजनात सावकारी पथकातील सचिन पतंगे पथक प्रमुख तथा सहायक निबंधक सहकारी संस्था नांदगाव खंडेश्वर, राजेश यादव पथक प्रमुख तथा सहायक निबंधक सहकारी संस्था अंजनगावसुर्जी, गजानन वडेकर सहकारी अधिकारी श्रेणी -1 भातकुली, अमोल लोमटे व.लपीक, अमरावती, आशिष भांडे सहकारी अधिकारी श्रेणी-2, उज्ज्वला मोहोड सहकारी अधिकारी श्रेणी-2 वसंत शेळके सहायक सहकारी अधिकारी, शुभांगी नंदेश्वर सहायक सहकारी अधिकारी तसेच पो.कॉ. सुर्यकांत केंद्रे, म.पो.कॉ. प्रतिक्षा राठोड, हेड कॉ. प्रफुल सहारे, म.पो. कॉ. माधुरी सराटे हे सदर कारवाई मध्ये सहभागी होते. सदर कारवाई सहकार विभाग व (Police Administration) पोलीस प्रशासनातील अधिकारी/कर्मचारी यांनी पार पाडली.