गोरेगाव/गोंदिया (Gondia ABC) : तालुक्यातील तेढा येथील एका शेतकर्याकडून मुरूम उत्खननासाठी तसेच कारवाई न करण्यासाठी तालुका प्रशासनातील (Taluka Administration) अधिकार्यांकडून लाचेची मागणी करण्यात आली. या प्रकरणी गोंदिया लाचलुचपत विभागाने (Gondia Bribery Division) सहनिशा करीत तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्यांसह एकूण ६ जणांवर कारवाई केल्याची माहिती आहे.या प्रकरणात लाचलुचपत विभागाकडून सर्व आरोपींविरुद्ध (Goregaon police) गोरेगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात येत आहे, अशी विश्वसनिय माहिती आहे. बातमी लिहेपर्यंत आरोपींनी नावे मिळू शकली नाही.
तहसीलदार, नायब तहसीलदारसह ६ जण अडकले
गोरेगाव तालुक्यातील तेढा (Goregaon police) येथील तक्रारकर्त्याचे दोन टिप्पर ४ मार्च रोजी अवैधरेती वाहतूक करतांना पकडण्यात आले. दरम्यान तहसीलदार यांनी दोन्ही टिप्परवर दंडात्मक कारवाई केली. यानुरूप तक्रारकर्त्यांनी १ लाख २३ हजार ८८३ रुपयाचा दंड भरना केला. दरम्यान दंडाची पावती सादर करून वाहन सोडण्याची विनंती केली असता, खाजगी व्यक्ती राजेंद्र गणविरच्या माध्यमातून दोन्ही वाहनांना सोडण्यासाठी तसेच पुढे अवैध व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी १ लाख रुपयाची मागणी केली. लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारकर्त्याने गोंदिया लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदविली. दरम्यान आज सापळा रचून चौकशी केली असता, खाजगी व्यक्ती राजेंद्र गणविर यांच्या माध्यमातून तहसीलदार किसन भदाने व नायब तहसीलदार नागपुरे हे दोन्ही अधिकारी लाच मागत असल्याचे समोर आले. मात्र सापडा दरम्यान लाच स्विकारण्यात आली नाही. यावरून तिन्ही आरोपींविरुद्ध लाचलुचपत विभागाने (Goregaon police) गोरेगाव पोलिसात गुन्हा नोंद केला आहे.
तहसीलदार विरुद्ध लाचखोरीचा दुसरा गुन्हा
तहसीलदार भदाने यांच्यावर आज ७ मे रोजी लाचलुचपत कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. यापुर्वी तहसीलदार भदाने हे ठाणे जिल्ह्यात कार्यरत असतांना १० लाख रुपये लाच स्विकारतांना सन २०१७ मध्ये अडकले होते. हे विशेष.