मानोरा (Cotton price) : तालुक्यातील (Agricultural Centre) कृषि सेवा केंद्रात राशी ६५९, अजित १५५ व कबड्डी कपाशी बिटी बियाणेची दुकानात बियाणे नसल्याचे कारण सांगत ज्यादा दराने विक्री सुरू असल्याचे शेतकरी बोलत आहेत. कृषि विभागाने कृषि सेवा केंद्राचे स्टॉक तपासणी करून एम आर पि भावाने बियाणे (cotton seed) उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
माहितीनुसार, रोहिणी नक्षत्र सुरू झाल्यावर बियाण्याची खरेदी करण्यासाठी शेतकरी (Agricultural Centre) कृषि सेवा केंद्रावर जात पसंतीचे बियाणेची विचारपूस करत आहेत. एम आर पि भावाने राशी ६५९ बॅग, अजित १५५ व कबड्डी बियाणे बॅग ची किंमत ८६४ रूपये आहे. सदर बियाणे कृषी सेवा केंद्रावर विकत घेण्यास शेतकरी जात आहे. तेंव्हा काही कृषि सेवा संचालक बियाणे नसल्याचे सांगून हेच (cotton seed) बियाणे १२०० रूपये प्रति बॅगने विक्री करत असल्याचे काही शेतकरी बोलत आहेत. त्यामुळे कृषि अधिकारी यांनी हा प्रकार थांबवून सबंधित विरोधात कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
बिटी कपाशी बियाणे एम आर पि पेक्षा ज्यादा दराने विक्री होत असल्यास शेतकरी बांधवांनी थेट माझ्याकडे लेखी तक्रार करावी, तसेच ज्यादा दराने (cotton seed) कपाशी बियाणे विक्रीचा प्रकार सुरू असल्यास तपासणी मोहीम राबवून सबंधिताविरुध्द कडक कार्यवाही करण्यात येईल.