आतापर्यंत १५ हजार क्विंटल कापूस खरेदी
५६६० रूपये कापसाला दर
हिंगोली (Cotton Price) : सीसीआय व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने लिंबाळामक्ता भागातील खुराणा जिनींगमध्ये कापूस खरेदी सुरू केली होती. अपुर्या जागेमुळे मागील आठवडाभर कापूस खरेदी बंद ठेवली असता आज ३० डिसेंबरपासून कापूस खरेदी पूर्ववत सुरू होणार आहे. हिंगोली शहराजवळील लिंबाळा मक्ता भागातील खुराणा जिनींगमध्ये ८ नोव्हेंबरला सीसीआय व हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Cotton Price) माध्यमातून कापूस खरेदीला सुरूवात करण्यात आली होती. खरेदी सुरू झाल्यानंतर १५ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली असताना जागेच्या अनुपब्लततेमुळे कापूस व सरकीच्या अतिरीक्त साठ्यामुळे २९ डिसेंबर पर्यंत कापूस खरेदी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
त्यानुसार आठवडाभर कापूस खरेदी (Cotton Price) बंद ठेवली होती. आता आज ३० डिसेंबर सोमवार पासून कापूस खरेदी पूर्ववत सुरू होणार आहे. त्यामुळे रविवारीच अनेक शेतकर्यांनी अनेक वाहनातून आपला कापूस विक्रीसाठी आणला होता. सीसीआय तर्फे कापसाला ५६६० रूपये दर दिला जात आहे.