कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन!
मानोरा (Cotton Sale Deadline) : कपास किसान ॲपवर नोंदणी कृत असलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांनीलवकरात लवकर ॲपद्वारे स्लॉट बुकिंग करून दि. २७ फेब्रुवारी अंतिम मुदत तारखेपर्यंत आपला कापूस विक्री करावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती डॉ संजय रोठे, सीसीआय सेंटरचे इन्चार्ज दिपक शर्मा व कोहिनूर जिनिंगचे संचालक तसलीम शेठ यांनी केले आहे.
भारतीय कपास निगम लिमिटेड भारत सरकार यांच्यामार्फत कपास किसान ॲपवर नोंदणीकृत असलेल्या सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चालू पीक वर्ष 2025-26 मध्ये किमान आधारभूत किमती एम एस पी मध्ये कापूस खरेदी करण्याचे अंतिम तारीख २७ फेब्रुवारी निश्चित केली आहे. म्हणून कपास किसान ॲपवरकृत असलेल्या सर्वत्र कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी किमान आधारभूत किमतीचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर ॲपद्वारे स्लॉट बुक करून अंतिम तारखेपर्यंत सीसीआय खरेदी केंद्रावर आपला कापूस विक्री करावा, असे आवाहन सीसीआय केंद्राचे इन्चार्ज, कोहिनूर जिनिंगचे संचालक व बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.




