आमदार नवघरे यांच्या लक्षवेधीनंतर हालचालींना वेग
वसमत (Vasmat Police) : अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार राजू पाटील नवघरे यांनी सर्वे नंबर 150 मधील नगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण झाल्याचा मुद्दा लक्षवेधी द्वारे मांडला होता त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मोठ्या (Vasmat Police) पोलीस बंदोबस्तात सर्वे नंबर 150 ची मोजणी झाली भूमी अभिलेख व नगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी मोजणी पूर्ण केली असून मोजणी संदर्भातील अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात येणार आहे त्यानंतरच नगरपालिकेची जागा नेमकी कुठे आहे याचा सोक्षमोक्ष लागणार आहे.
वसमत नगरपालिकेच्या संपादित भूखंडावर अतिक्रमण झाले असल्याची तक्रार आमदार राजू पाटील नवघरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी द्वारे केली होती त्यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त करून तात्काळ कारवाई करण्यात येईल असे जाहीर केले होते त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मोजणी प्रक्रिया सुरू झाली.
वसमतनगर परिषदेचे जलशुद्धीकरण केंद्र, पेट्रोल पंप परिसर ते अशोकनगर रस्त्यापर्यंत ,नगरपालिकेच्या कर्मचारी (Vasmat Police) वसाहतीस दिलेली जागा ते शासकीय रुग्णालयाची वसाहत पर्यंत मोजणी करण्यात आली आहे संपूर्ण 150 सर्वे नंबरची मोजणी मंगळवारी पार पडली.
सर्वे नंबर 150 मध्ये नगरपालिकेने चार एकर 27 गुंठे जागा संपादित केलेली आहे मात्र यापैकी काही भागावर अतिक्रमण करून नगरपालिकेच्या मालमत्तेचे नुकसान झाले असल्याचे आमदार राजू पाटील नवघरे यांनी लक्षवेधी द्वारे मांडले होते. नगरपालिकेच्या मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी कारवाई न करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी आमदार राजू पाटील नवघरे यांनी अधिवेशनात लक्षवेधी द्वारे केली होती. त्या पार्श्वभूमीवर कारवाईला सुरुवात झाली आहे मंगळवारी भूमीअभिलेख विभागाचे अधिकारी कर्मचारी (Vasmat Police) वसमत नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने सगळे नंबरची मोजणी करण्यासाठी तैनात होते.
मोजणीच्या पार्श्वभूमीवर मोठा (Vasmat Police) पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता पोलीस अधिकारी कर्मचारी होमगार्ड असा तगडा बंदोबस्त होता मोजणी अत्यंत शांततेत पार पडली सर्वे नंबर 150 मधील जागा मालक सातबाराधारक यांना मोजणीपूर्वी नोटीस बजावण्यात आल्या होत्या. सर्वांनी मोजणीला सहकार्य केले त्यामुळे कोणताही गोंधळ न होता. शांततेत मोजणी प्रक्रिया पार पडली आता मोजणीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांचे अध्यक्षते खालील समितीला पाठवण्यात येणार आहे त्यानंतरच नगरपालिकेने संपादित केलेली जागा नेमकी कोठे गेली आहे हे स्पष्ट होणार आहे.
एवढा मोठा पोलीस बंदोबस्त कशासाठी
नगरपालिकेच्या मालकीची जमीन शोधण्यासाठी मोजणी प्रक्रिया मंगळवारी पार पडली. मोजणीसाठी प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यापूर्वीही या जागेची अनेकदा मोजणी झाली. त्यावेळी कोणताही पोलीस बंदोबस्त लावण्यात आला नव्हता. आता मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त नेमका कशासाठी लावला हा प्रश्न उपस्थित होत आहे. अतिक्रमण हटवण्याच्या कामासाठी (Vasmat Police) पोलीस बंदोबस्त लावणे समजू शकते मात्र रीतसर जमीन मोजण्यासाठी पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ही जमीन मोजताना कोणताही अडथळा येणार नव्हता. कोणाकडून विरोधी होणार नव्हता. असे असताना एवढा मोठा फौज फाटा नेमका कशासाठी तैनात करण्यात आला होता हे समजणे अवघड आहे.