हिंगोली (Liquor Prohibition Department) : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अधिक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ८ नोव्हेंबरला औंढा नागनाथ तालुक्यातील साळणा येथे छापा मारून ३० हजार २४० रूपयाचे ९ देशी दारूचे बॉक्स जप्त केले. याप्रकरणी दोन आरोपींवर गुन्हे नोंदविण्यात आले.
विधानसभा आदर्श आचारसंहीता अनुषंगाने (Liquor Prohibition Department) राज्य उत्पादन शुल्क विभागाने ८ नोव्हेंबर रोजी निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, हिंगोली यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे साळणा ता.जि. हिंगोली परिसरामध्ये छापा टाकून २ आरोपी विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलमांतर्गत गुन्हा नोंद केला. सदर कारवाईत देशी मद्याच्या (१८० मिलीच्या) ९ बॉक्स असा एकुण रु.३०,२४०/-(रु. तीस हजार दोनशे चाळीस मात्र) किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन २ आरोपी विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलमांतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले.
हि कारवाई अधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मोहन मातकर, दुय्यम निरीक्षक कृष्णकांत पुरी (बीट क्र.१), पी. बी. गोणारकर, (बीट क्र.२) श्रीमती ज्योती गुट्टे (बीट क्र.३) तसेच त्यांचा जवान संवर्गीय स्टाफ यांनी पार पाडली.