कारंजा(Washim):- ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या शेवती येथे 16 जूनला रात्री 9 वाजताच्या सुमारास शेतीच्या वादातून एका भावाने दुसऱ्या भावावर चाकूहल्ला (knife attack) केला. या घटनेतील जखमीचा उपचारादरम्यान अमरावती(Amravati) येथे मृत्यू झाला. त्यामुळे ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा (crime of murder) दाखल केला.
दोघा भावात वाद; दुसऱ्यावर चाकूने वार
दरम्यान, कारंजा न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. गजानन मनिराम देवळे रा.शेवती असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेतील मृतक व आरोपी हे सख्खे भाऊ असून, ‘आजीच्या नावे असलेली संपूर्ण जमीन तू माझ्या नावे का करून देत नाही, या कारणावरून दोघा भावात वाद झाला आणि वादाचे पर्यावरण हाणामारीत होऊन एकाने दुसऱ्यावर चाकूने वार केले. चाकूच्या वाराने गजानन मनीराम देवळे हे गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी अमरावती (Amravati) येथे पाठविण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यामुळे ग्रामीण पोलिसांनी मृतकाची मुलगी पल्लवी हिच्या फिर्यादीवरून आरोपी महादेव मनिराम देवळे याच्याविरुद्ध प्रारंभी भा. द.वि च्या कलम 307 नुसार गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर भा.द.वि.च्या कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा अधिक तपास ठाणेदार प्रवीण खंडारे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहोड करीत आहे.