नवी दिल्ली (Covaxin) : कोरोना लसीच्या (Covaxin) दुष्परिणामांचा दावा करणाऱ्या BHU च्या अभ्यासाबाबत मोठे विधान समोर आले आहेत. ज्यामध्ये ICMR महासंचालक डॉ. राजीव बहल यांनी BHU च्या संशोधनाचा हवाला देऊन केलेल्या दाव्याला उत्तर दिले आहे. त्यांनी सांगितले की. कोवॅक्सिन लस देण्यात आलेल्या 30 टक्के लोकांना गंभीर दुष्परिणाम दिसले.
30 टक्के लोकांना काही प्रकारचे दुष्परिणाम
Covaxin च्या दुष्परिणामांवर नुकतेच BHU मध्ये संशोधन झाले. हे संशोधन एका परदेशी जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे. यानंतर, Covaxin च्या दुष्परिणामांबद्दल मीडियामध्ये अनेक अहवाल आले. एका नवीन अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, (Covaxin) कोवॅक्सिन लस देण्यात आलेल्या 30 टक्के लोकांना काही प्रकारचे दुष्परिणाम जाणवले. यानंतर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ICMR ने या संशोधनावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आता ICMR महासंचालक डॉ. राजीव बहल यांनी अभ्यासाचे लेखक आणि जर्नलच्या संपादकांना पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी हे संशोधन पूर्णपणे दिशाभूल करणारे आणि चुकीच्या तथ्यांवर आधारित असल्याचे लिहिले आहे. याचा ICMR शी काही संबंध नाही. यासाठी तांत्रिक किंवा आर्थिक सहाय्य दिलेले नाही, असे ICMR ने सांगितले आहे. एवढेच नाही तर त्यांनी आयसीएमआरचे नाव काढून टाकण्यास सांगितले आहे.
ICMR कडून आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य
बीएचयूच्या अभ्यासात असा दावा करण्यात आला होता की, ज्यांना (Covaxin) कोवॅक्सिन लस देण्यात आली होती. त्यापैकी 30 टक्के लोकांना काही प्रकारचे दुष्परिणाम दिसले. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ICMR ने या अभ्यासाबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ICMR महासंचालकांनी प्रोफेसर शंखशुभ चक्रवर्ती, जेरियाट्रिक मेडिसिन विभागाचे अध्यक्ष आणि डॉ. उपिंदर कौर यांना नोटीस बजावली आहे. त्याची एक प्रत आयएमएस बीएचयूचे संचालक प्रोफेसर एसएन शंखवार यांनाही पाठवण्यात आली आहे. दुसरीकडे, प्रोफेसर चक्रवर्ती यांनी त्यांच्या संशोधनाच्या प्रकाशनात ICMR कडून आर्थिक आणि तांत्रिक सहाय्याबद्दल सांगितले आहे.