महागांव (Yawatmal):- महागांव तालुक्यातील माळवागद शेत शिवारात देवा उत्तम आगोशे यांच्या शेतातून जात असलेली इलेक्ट्रिक मेन लाईन(Electric main line) चे तार तुटल्यामुळे पाणी पिण्यासाठी जात असलेली दुभती गाय (cow) करंट (current) लागून जागेवर मृत्युमुखी (deathly) पडली दिलीप दामोदर राठोड असे गाय मालकाचे चे नाव असून या गाईला चार ते पाच महिन्याचा बछडा आहे. या गायीच्या मृत्यूमुळे सदर शेतकऱ्याचे 25 हजाराचे नुकसान (damage) झाले असून माळवागद शेत शिवारात महावितरणाच्या (Mahavatrana) भोंगळ कारभारामुळे नियमित असे प्रकार घडत असून आजच्या या घटनेस जबाबदार असलेल्या सदर विभागातील विज वितरण कर्मचारी यांचे वर कठोर कार्यवाही(Proceedings) करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मोहन चव्हाण यांनी केली आहे.