तिरोडा/ गोंदिया (Cow-killing case) : मध्यप्रदेश राज्यात काही दिवसांपूर्वी सामुहिक (Cow-killing case) गौ-हत्या प्रकरण समोर आले. या प्रकरणाचा बजरंग व (Bajrang Dal and VHP) विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून तीव्र निषेध नोंदविण्यात येत आहे. त्यातच या घटनेच्या निषेधार्थ आज (Bajrang Dal) बजरंग दलच्या वतीने तिरोडा बंदची हाक देण्यात आली. दरम्यान तिरोडा येथील व्यापार्यांनी बजरंग दलच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज, शहरात कडकडीत बंद पाळून घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. तहसीलदार मार्फत या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी तसेच भविष्यात असे प्रकरण घडू नये, या मागणीचे निवेदन राष्ट्रपतींना पाठविण्यात आले.
बजरंग दल व विहिंपच्या हाकेला व्यापार्यांचा प्रतिसाद
मध्यप्रदेश राज्यातील शिवनी जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी सामुहिक (Cow-killing case) गौ-हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तीव्र निषेध जिल्ह्याभरातून नोंदविला जात आहे. काही दिवसांपूर्वी गोंदिया येथे श्रीकृष्ण गौरक्ष सभा, बजरंग, विंहिपच्या वतीने मुक मोर्चा काढून निषेध नोंदविण्यात आला होता. त्याचबरोबर (Bajrang Dal) बजरंग तिरोडा शाखेच्या वतीने आज (ता.२७) घटनेच्या निषेधार्थ शहर बंदची हाक देण्यात आली. आज, सकाळपासून बजरंग दलच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील व्यापार्यांनी आपले प्रतिष्ठाण बंद ठेवली. तिरोडा शहरातील बाजारपेठ पूर्णत: बंद राहिली. घटनेच्या निषधार्थ तिरोडा कडकडीत बंद ठेवण्यात आला. त्याचप्रमाणे (Bajrang Dal) बजरंग दलच्या पदाधिकार्यांकडून घटनेचा निषेध नोंदवून आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी, भविष्यात अशा घटना होऊ यासाठी कायदा करावा, अशा मागणीचे निवेदन तहसीलदारमार्फत राष्ट्रपतींना देण्यात आले.