गोंदिया (Gondia):- गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील वन परिक्षेत्र (Jungle area) अंतर्गत येणाऱ्या मौजा मालकनपुर येथील कक्ष क्रमांक 257 मध्ये वन्यप्राणी वाघाने इटखेडा येथील संभाजी नगर निवासी शंकर तुकाराम भागडकर यांचा एक गोरा एक गाय यांच्यावर हल्ला करून ठार केले तर एक बैल (Bull) जखमी झाला आहे.
तर दुसऱ्या घटनेत मालकनपूर बीट कक्ष क्रमांक 256 बी मध्ये वाघाने (tiger)जंगलाच्या बाहेर मालकनपूर निवासी सदानंद पाटणकर यांचा एक गोरा तसेच जितेंद्र नामदेव कल्लारी यांचा एक गोरा वाघाने ठार मारले आहे. दिवसाढवळ्या वाघाने केलेल्या या शिकारीमुळे गावात व परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून वाघाचा त्वरीत बंदोबस्त वनविभागाने(forest department) करावे अशी मागणी ग्रामवासियांनी केली आहे. सदर घटनेची माहिती अर्जुनी/मोरगाव वनपरिक्षेत्र कार्यालय येथिल अधिकारी कर्मचाऱ्यांना देण्यात आली असुन नागरिकांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.