महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांचे प्रतिपादन
बुलढाणा (Credit Union Federation) : महाराष्ट्राच्या उद्याच्या सहकार चळवळीला योग्य दिशा देण्याचे काम आंतरराष्टीय सहकार चळवळ करणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी केले. 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. या अनुषंगाने 10 व 11 फेब्रुवारी रोजी शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय महिला व युवक सहकार परिषद होणार आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी काकासाहेब कोयटे हे शनिवारी बुलढाण्यात आले होते.
स्थानिक हॉटेल रामा ग्रँडच्या सभागृहात आयोजित बैठकीत पतसंस्था फेडरेशनच्या (Credit Union Federation) पदाधिकाऱ्यांसह विविध पतसंस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधतांना ते म्हणाले की, आंतरराष्ट्रीय महिला व युवक परिषदेसाठी जगातील 10 देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. तर इतर राज्यातून 16 प्रतिनिधी सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. परिषदेत सहभागी होण्यासाठी मुंबई व नागपूर येथून सहकार दिंड्याही येणार आहेत. तर परिषदेत राज्यभरातून हजारो महिला व युवक सहभागी होणार आहेत. बैठकीला (Credit Union Federation) महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे महासचिव शशिकांत राजोबा, खजिनदार दादाराव तुपकर, संचालक राजुदास जाधव, संचालक बांगर, तज्ञ संचालक सुदर्शन भालेराव, सिईओ सुरेखा लवांडे व सहकार भारतीचे बुलढाणा तालुकाध्यक्ष शिवाजी तायडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
या (Credit Union Federation) बैठकीच्या यशस्वीतेसाठी मॉ जिजाऊ अर्बन पतसंस्था, अदिती अर्बन पतसंस्था, मराठा अर्बन पतसंस्था, राजर्षी शाहु पतसंस्था, स्व.रामभाऊ लिंगाडे पतसंस्था, जनकल्याण पतसंस्था, शिवसाई पतसंस्था, विवेकानंद अर्बन, महाराष्ट्र ग्रामीण पतसंस्था, विदर्भ अर्बन पतसंस्था, लोकराजा अर्बन पतसंस्था, प्रताप ग्रामीण पतसंस्था, शिवाजी अर्बन पतसंस्था, तुळजाई अर्बन पतसंस्था, वर्धमान अर्बन, जगदंबा ग्रामीण पतसंस्था, भूमिपुत्र अर्बन पतसंस्थांसह आदी पतसंस्थांचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.