विराट कोहलीला मिळाला मोठा पुरस्कार
नवी दिल्ली/मुंबई (Cricket Rating Awards) : CEAT क्रिकेट रेटिंग अवॉर्ड्स 2024 मुंबईत आयोजित करण्यात आले होते. या (Cricket Rating Awards) कार्यक्रमात अनेक नामवंत क्रिकेटपटू आणि प्रशासक उपस्थित होते. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष आंतरराष्ट्रीय क्रिकेटर म्हणून निवड करण्यात आली. दरम्यान, राहुल द्रविडला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विराट कोहलीला वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष एकदिवसीय फलंदाज, तर मोहम्मद शमीला वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष कसोटी गोलंदाज म्हणून गौरवण्यात आले. (Cricket Rating Awards) बीसीसीआयचे सचिव जय शाह यांना क्रीडा प्रशासनातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले. शाह यांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि सांगितले की, मी तुम्हाला राजकोटमध्ये सांगितले होते की, आम्ही बार्बाडोसमध्ये आमचा ध्वज फडकवणार आहोत आणि आमच्या कर्णधाराने तसे केले. 1.4 अब्ज लोकांचा आशीर्वाद मिळाल्यास चॅम्पियन्स ट्रॉफी, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि महिला टी-20 वर्ल्ड कपमध्येही आम्ही असेच करू शकतो.
पुरस्कार विजेत्या खेळाडूंची यादी
- पुरूष आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू: रोहित शर्मा
- वर्षातील सर्वोत्तम कसोटी फलंदाज: यशस्वी जैस्वाल
- वर्षातील सर्वोत्तम कसोटी गोलंदाज: आर अश्विन
- एकदिवसीय सर्वोत्तम फलंदाज: विराट कोहली
- एकदिवसीय सर्वोत्तम गोलंदाज: मोहम्मद शमी
- T20I वर्षातील सर्वोत्तम फलंदाज: फिल सॉल्ट
- T20 वर्षातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज: टिम साउथी
- T20 लीडरशिप अवॉर्ड: श्रेयस अय्यर (KKR)
- जीवनगौरव अवॉर्ड : राहुल द्रविड
- क्रीडा प्रशासनातील उत्कृष्टतेसाठी पुरस्कार: जय शाह
- महिला T20 आंतरराष्ट्रीय इतिहासात कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने: हरमनप्रीत कौर
- वर्षातील महिला भारतीय गोलंदाज: दीप्ती शर्मा
- महिला कसोटीतील सर्वात जलद द्विशतक: शेफाली वर्मा