परभणी (Parbhani):- शहरातील रमाबाई नगरामधील एका अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेण्यात आले. या प्रकरणी आरोपीवर कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल (crime filed) करण्यात आला आहे.
स्थानकावर शोध घेतला असता मुलगी मिळून आली नाही
मुलीच्या वडिलांनी या बाबत तक्रार दिली आहे. परिवारासह घरामध्ये झोपलेले असताना फिर्यादी हे लघुशंकेला उठले. यावेळी त्यांना त्यांची अल्पवयीन मुलगी दिसून आली नाही. रेल्वे स्टेशन(railway station), बसस्थानक(busstand) आदी ठिकाणी शोध घेण्यात आला. त्यांना अनिल शिंदे याच्यावर संशय असल्याने फिर्यादीने संबंधिताच्या बहिणीच्या घरी जावून विचारणा केली. या दरम्यान सेलू येथील रेल्वे स्टेशनवर अनिल शिंदे याची मोटारसायकल पार्किंगमध्ये दिसून आली. स्थानकावर शोध घेतला असता मुलगी मिळून आली नाही. अनिल शिंदे याने अल्पवयीन मुलीस अज्ञात कारणासाठी फुस लावून पळवून नेले असे अशी तक्रार (complaint)कोतवाली पोलिसात देण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.