पूर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथील घटना!
पूर्णा (Crime Case) : शेतात पाणी येण्याच्या कारणावरुन झालेल्या वादात एकावर ऊस तोडण्याच्या धारदार कोयत्याने वार करत जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना पूर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथे घडली. सदर प्रकरणी ८ ऑक्टोबरला चुडावा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.
चुडावा पोलिसात गुन्हा दाखल!
गजानन साखरे यांनी तक्रार दिली आहे. विश्वनाथ साखरे याच्यावर गुन्ह्याची नोंद झाली आहे. आरोपीच्या शेतातील पाणी फिर्यादीच्या शेतात येत असल्याने फिर्यादीने संबंधिताला तुझ्या शेतातले पाणी आमच्या शेतात येऊ देऊ नको, असे म्हणाले. याचा राग मनात धरत आरोपीने फिर्यादीला तु शेतामध्ये मला खुप बोललास आता तुझी बघतो, असे म्हणत हातातील ऊस तोडण्याच्या धारदार कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात, हातावर, मानेवर जीवे मारण्याच्या उद्देशाने वार करत गंभीर जखमी केले. तसेच धमकी दिली. या प्रकरणी चुडावा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पोउपनि. मुखेडकर करत आहेत.


