जीवे मारण्याची धमकी देवून भांडण!
मानोरा (Crime Case) : मानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजे इंझोरी येथील माजी पोलीस पाटील यांना पोलिसांना लोकांचे घर का दाखविता या कारणावरून शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देवून भांडण केल्याप्रकरणी फिर्यादी माजी पोलीस पाटील दुर्योधन सिताराम काळेकर यांच्या तक्रारीवरून आरोपी गोपाल रामचंद्र यादव यांच्यावर पोलिसांनी अदखल पात्र गुन्हाची नोंद (Crime Record) करून विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांना लोकांचे घर का दाखवता असे वाद घालून शिवीगाळ केली!
पोलीस सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार तक्रारदार दुर्योधन सिताराम काळेकर हा इंझोरी गावाचा माजी पोलीस पाटील आहे. त्याला रिटायर्ड होवून चार वर्ष झाले आहे. पोलीस गावात आले असता पोलिसांनी रिटायर्ड पोलीस पाटील यांना कुणाल शिंदे व वैभव डवरे यांचे घर विचारले त्यांनी त्यांचे घर दाखविले. यावरून शनिवारी ( दि. ११ ऑक्टोबर ) माजी पोलीस पाटील बस थांबा इंझौरी येथे उभा असताना गावातील आरोपी गोपाल रामचंद्र यादव तेथे आला. व पोलिसांना लोकांचे घर का दाखवता असे वाद घालून शिवीगाळ करत जीवाने मारण्याची धमकी दिली. व भांडण केले. अशा आशयाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम २५१ ( २ ) , २५१ ( ३ ), २५२ नुसार गुन्हा दाखल (Filed a Case) करून घटनेचा अधिक तपास बिट जमादार याजकडे सोपविला आहे.