परभणीच्या गंगाखेड अप्पर जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
गंगाखेड(parbhani):- आठ वर्षीय मुलीचा विनयभंग (molestation) करणाऱ्या आरोपीस गंगाखेड अप्पर जिल्हा सत्र न्यायालयाचे (District Sessions Courts) न्यायाधीश डी. डी. कुरुलकर यांनी दिनांक ७ मे मंगळवार रोजी चार वर्ष सश्रम कारावास व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की सोनपेठ तालुक्यातील नैकोटा येथील इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या आठ वर्षीय मुलीचा गावातीलच किर्तेश्र्वर प्रल्हादराव साठे वय २४ वर्ष याने विनयभंग केल्याची तक्रार पिडीत मुलीच्या आईने सोनपेठ पोलीस ठाण्यात दिली होती. याप्रकरणी विनयभंग व बाल लैंगिक अत्याचाराचे (Sexual assault) विविध कलम व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 2012 च्या कलमान्वये गुन्हा दाखल (Filed a case) झाल्यानंतर सोनपेठ पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी एस.एम. मुपडे यांनी याचा तपास पूर्ण करून गंगाखेड अप्पर जिल्हा सत्र न्यायालयात आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र दाखल केल्यानंतर जिल्हा सत्र न्यायाधीश डी.डी. कुरुलकर यांनी या विशेष सत्र खटला क्रमांक 4/2019 या प्रकरणांमध्ये एकूण नऊ साक्षीदार तपासले.
link वर click करा
https://deshonnati.com/washim-one-year-rigorous-imprisonment-for-molestation/
विविध कलमांखाली चार वर्ष सश्रम कारावास
या साक्षीदारांमधील सुसंगतपणा व प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या (Eyewitnesses)साक्षीचा पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी किर्तेश्वर प्रल्हादराव साठे यास विविध कलमांखाली चार वर्ष सश्रम कारावास (rigorous imprisonment) व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. सचिन दिगंबरराव वाकोडकर यांनी जिल्हा सहाय्यक सरकारी वकील ॲड. डी. यू. दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली युक्तिवाद केला. त्यांना सहाय्यक सरकारी वकील ॲड. सचिन बालासाहेब पौळ, कोर्ट पैरवी अधिकारी जयराम दुधाटे यांनी सहकार्य केले.