नांदेड (Nanded):- देगावचाळ येथून वजीराबाद ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून गावठी पिस्तूल (pistol) व 6 जिवंत काडतुस जप्त केले.
सहाय्यक पोलिस अधीक्षक किरतीका एम.एस,पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वजीराबाद गुन्हे शोध पथकाचे(search team) अधिकारी सपोनि आर.डी. वटाणे त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून मार्कण्डेय मंदीर, देगांवचाळ येथे छापा मारुन मोहमद रफीक मोहमद शकील (26) या ऑटोचालकास पकडले. त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यामध्ये एक गावठी पिस्तुल, 6 काडतुस ताब्यात बाळगलेला मिळुन आला. याप्रकरणी सपोनि आर.डी. वटाणे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वजीराबाद पोलिसांनी गुन्हा दाखल(Filed a case) केला आहे.