पिंपरी चिंचवड:- पीडित महिला आणि तिचा पती मुळचे नेपाळचे आहेत. पुण्यात ते दोघे कामासाठी आले.आरोपीला दारूचे व्यसन आहे. आरोपी काहीच काम-धंदा करत नव्हता. या दाम्पत्याला दोन मुली आणि नऊ महिन्याचा एक मुलगा आहे. दरम्यान, आरोपी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला वारंवार मारहाण करत होता. ११ मे रोजी रात्री दहाच्या सुमारास त्याने पुन्हा पत्नीला चारित्र्याच्या संशयावरून(Doubt) मारहाण (beating) केली. पत्नीच्या गुप्तांगावर ब्लेडने वार करून तिला गंभीर जखमी (seriously injured) केले. यावर न थांबता त्याने पत्नीला चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पत्नीला ओढणीच्या सहाय्याने बांधून लोखंडी खिळ्याने पत्नीच्या गुप्तांगाला छिद्र पाडले आणि कुलूप लावले. त्यानंतर त्याने चावी फेकून दिली. सहा दिवस पत्नीने त्रास सहन केला.
प्रकार पाहिल्यानंतर उपचार करणारे डॉक्टरही हादरले
मात्र, जखमांमध्ये इन्फेक्शन होऊन जखमा चिघळण्यास सुरूवात झाली. वेदना सहन करण्याच्या पलीकडे गेल्यानंतर पत्नीने महापालिकेचे (Municipal Corporation) यशवंतराव चव्हाण रुग्णालयात धाव घेतली. हा प्रकार पाहिल्यानंतर उपचार करणारे डॉक्टरही हादरून गेले. चावी मिळत नसल्याने अखेर डॉक्टरांवर शस्त्रक्रिया(Surgery) करून कुलूप काढण्याची वेळ आली. आरोपी पती हा मनोविकृत(demented) असून गावी नेपाळ येथेही तो पत्नीवर अत्याचार करीत होता. आरोपी पतीला अटक केल्यानंतर पोलीसांनी त्याला नायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी दिली. त्याची रवानगी येरवडा कारागृहात(Yerwada Jail) करण्यात आली आहे. चारित्र्यावर संशय घेऊन आरोपीने विकृतीचा कळस गाठल्याचं पाहायला मिळालं. या प्रकारावर पोलिसांनीही संताप व्यक्त केलाय.