धोतर सोडून अपमानीत; वयोवृद्धाने विष प्राशन केले
मानोरा (Washim Crime) :-अपमानास्पद वागणूक दिल्याने एका वयोवृद्धाने वीष घेऊन आत्महत्या केली. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध मानोरा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला.
तळप बु., येथील भास्कर प्रल्हाद राठोड यांनी ८ मे रोजी तक्रार दिली की, माझी आई व वडिलांसोबत गैरअर्जदार हे वारंवार कोणत्याही कारणावरून भांडत असत. तळप बु, येथे ५ मे रोजी सकाळी वडिल प्रल्हाद गुलाब राठोड (वय ७५) यांचे सोबत ऍटो पाईन्ट वर भांडण करून त्यांना गैरअर्जदारांनी मारहाण केली आणि धोतर सोडून अपमानीत केले. त्यातून मानसिक धक्का (mental shock) बसल्याने विष(poison) प्राशन केले. त्याच्यावर ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करून अकोला येथे उपचारासाठी पाठविण्यात आले.
मृत्यूस कारणीभूत असलेल्या आरोपीविरुद्ध कारवाईची मागणी
अकोला येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या(Government Medical Colleges) सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असताना ७ मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या आरोपीविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी फिर्यादी यांनी पोलिस स्टेशनला (Police Station)केली. त्यावरून पोलिसांनी आरोपी मीराबाई सीताराम राठोड, विकास सीताराम राठोड, अमर सीताराम राठोड, उज्ज्वला सीताराम राठोड यांच्याविरुद्ध कलम ३०६, ३२३, ५०६, ५९४, ३४ भा.दं. वि. नुसार गुन्हा दाखल केला. ठाणेदार प्रवीण शिंदे यांचे मार्गदर्शन मध्ये अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर नागरे करीत आहेत.