कळमनुरी गुन्हे शाखा कारवाई

कळमनुरीत पुन्हा गावठी पिस्तूल जप्त; तीन जिवंत काडतुसेही हस्तगत

Kalamnuri Crime Branch Action: शहरात अवैध शस्त्र बाळगणार्‍यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने एक दिवसापूर्वी दोन जणांविरुद्ध गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे बाळगल्या

कळमनुरीत पुन्हा गावठी पिस्तूल जप्त; तीन जिवंत काडतुसेही हस्तगत

Kalamnuri Crime Branch Action

 

स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईनंतर दुसर्‍याच दिवशी कळमनुरी पोलिसांची धडक कारवाई; आरोपी ताब्यात

कळमनुरी (Kalamnuri Crime Branch Action) : शहरात अवैध शस्त्र बाळगणार्‍यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने एक दिवसापूर्वी दोन जणांविरुद्ध गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी कारवाई केली होती. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी, ४ नोव्हेंबर रोजी कळमनुरी पोलिसांनी आणखी एका तरुणाकडून गावठी पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवराज प्रकाश मोरे (वय २४, रा. तांबोळी गल्ली, कळमनुरी) हा तरुण मोठा मारोती मंदिराजवळील सांडसकडे जाणार्‍या रस्त्यावर विनापरवाना गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगून असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक मयूर विजयकुमार रसाळ यांनी कारवाई केली. या कारवाईत आरोपीकडून अंदाजे ३० हजार रुपये किमतीचे लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तूल आणि मॅगझीनमधील तीन जिवंत काडतुसे, प्रत्येकी एक हजार रुपये किमतीची, असा एकूण ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी (Kalamnuri Crime Branch Action) पोलीस उपअधीक्षक मयूर रसाळ यांच्या फिर्यादीवरून कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार दिलीप पोले करीत आहेत. दरम्यान, सलग दोन दिवसांत गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त झाल्याने शहरात अवैध शस्त्रांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या शस्त्रांचे स्रोत काय, तसेच आणखी कोणाकडे अवैध शस्त्रे आहेत का, याचा शोध पोलीस घेत आहेत.