औंढा नागनाथ (Aundha Nagnath Police Action) : पोलीस ठाणे हद्दीतील गावात सर्वसामान्य नागरिकांवर दहशत निर्माण करून सार्वजनिक शांततेचा भंग करणार्या औंढा नागनाथ तालुक्यातील उमरा येथील दोघेजण तर वाघी येथील एक अशा तिघांवर एक वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे तसे आदेश प्रभारी पोलीस अधिक्षक कमलेश मीना यांनी ३१ ऑक्टोबर रोजी काढले आहेत.
औंढा नागनाथ पोलीस ठाणे (Aundha Nagnath Police Action) हद्दीत शांतता नांदावी यासाठी औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांनी सर्वसामान्य जनतेत दहशत निर्माण करून सार्वजनिक शांततेचा भंग करणार्या गाव गुंडांना हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार करण्यासंदर्भाने प्रस्ताव पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्याकडे पाठवला होता या प्रस्तावाची जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात पडताळणी केली होती. औंढा ना. तालुक्यातील पप्पू उर्फ बाळू रावसाहेब बोंगाणे, गोविंद उर्फ बाळू देवराव पावडे दोघे रा. उमरा तालुका औंढा नागनाथ, तर जालिंदर चांदोजी बोखारे रा. वाघी ता. वसमत या तिघांना हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार केल्याचे आदेश ३१ ऑक्टोबर रोजी प्रभारी पोलीस अधिक्षक कमलेश मीना यांनी काढले आहेत. सर्वसामान्य जनतेत दहशत निर्माण करून सार्वजनिक शांततेचा भंग करणार्या वर हद्दपारची कारवाई केल्याने स्वयंघोषित गावगुंडांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
सर्वसामान्य जनतेतून या कारवाईचे स्वागत होत आहे. पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांनी औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर सर्वसामान्य जनतेत दहशत निर्माण करणार्यावर कायदेशीर कडक कारवाई केली. पोलीस ठाणे हद्दीतील तिघांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केल्याने दहशत निर्माण करणार्यांची चांगलीच नशा उतरवली आहे. यापुढेही ठाणे हद्दीत दहशत वाजवण्याचा प्रयत्न करणार्या गावगुंडावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
औंढा नागनाथ पोलिस कारवाई
औंढा ना. पोलिस ठाणे हद्दितील तिघांवर हद्दपारीची कारवाई
Aundha Nagnath Police Action: पोलीस ठाणे हद्दीतील गावात सर्वसामान्य नागरिकांवर दहशत निर्माण करून सार्वजनिक शांततेचा भंग करणार्या औंढा नागनाथ तालुक्यातील उमरा येथील दोघेजण..
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Aundha Nagnath Police Action