पतीची गळा आवळून हत्या
वर्धा(Wardha):- घरगुती कलहातून झालेल्या वादात पतीची गळा आवळून हत्या (murder)करण्यात आली. ही घटना मंगळवारी ७ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास परिसरात नागठाणा येथे घडली. चौकशीदरम्यान या घटनेचे बिंग फुटले आणि शवविच्छेदन (Autopsy) अहवालावरून ८ मे रोजी हत्येचा गुन्हा दाखल (Filed a case) करीत आरोपी पत्नीस अटक केली. गणेश हरिभाऊ भलावी (वय ४०) रा. नागठाणा असे मृतकाचे नाव आहे. नागठाणा येथील रोजमजुरी करणारे गणेश भलावी सकाळी मजुरी कामासाठी निघाले. रात्री उशिरा घरी परतल्यानंतर गणेशचा पत्नी सुनीताशी घरगुती कारणातून वाद (dispute) झाला. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. संतापलेल्या पत्नीने रागाच्या भरात पती गणेशची गळा आवळून त्याची हत्या केली.
घटनास्थळी पाहणी केली असता काही बाबी संशयास्पद
घटनेची माहिती मिळाल्यानंतर सावंगी ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप कापडे यांनी कर्मचाऱ्यांसह नागठाणा परिसर गाठून पंचनामा केला. घटनास्थळी ठसे तज्ज्ञ, श्वान पथकाला (Dog Squad) पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्यांत सुनीता गणेश भलावी हिचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. पत्नी सुनीताने पती गणेशची हत्या केल्यानंतर त्याने गळफास घेतल्याचा बनाव केला. घटनास्थळी पाहणी केली असता काही बाबी संशयास्पद वाटल्या. चौकशीदरम्यान पत्नीनेच हत्या केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी मृतकाची पत्नी सुनीता गणेश भलावी हिला अटक केली.तिला न्यायालयात हजर करण्यात आले.तिला तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.पुढील तपास सावंगी मेघे पोलीस करीत आहे.