नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 3 लाख 73 हजाराचा मुद्देमाल जप्त
नांदेड (crime news) : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत (crime news) खुनासह घरफोडी प्रकरणातील फरार आरोपीस जेरबंद केले. त्याच्याकडून नगदी 21 हजार रुपये व सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 3 लाख 73 हजार 200 रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे,अप्पर पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे (Nanded police) पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी वाहूळे व त्यांच्या टीमने संतोष उर्फ चॉकलेट्या भोसले वय 45 वर्षे राहणार वहाद तालुका कंधार यास ताब्यात घेतले. त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. यामध्ये पोलिसांनी 48 ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व नगदी 21 हजार रुपये असा एकूण 3 लाख 73 हजार 200 रुपये किमतीचा ऐवज जप्त केला.