वसईत नेमकं काय घडलं?
वसई (Crime News) : काही घटना मन सुन्न करणाऱ्या असतात. या (Vasai Massacre) घटनांवर काय बोलावं ? कसं व्यक्त व्हावं हे आपल्याला समजत नाही. अशीच एक घटना वसईत घडली आहे. दिवसा-ढवळ्या एका मुलीची निर्घृण हत्या (Brutal murder) करण्यात आली. ब्रेकअप केल्याच्या रागातून प्रियकराने तरुणीवर लोखंडी पान्याने वारंवार वार केले. या घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे.
माणुसकीचा मुडदा पडला
आरती यादव नावाची 22 वर्षीय मुलगी वसई पूर्व येथील वालीवमध्ये असलेल्या चिंचपाडा येथे सकाळी ९ च्या दरम्यान कामाला जात होती. यावेळी भररस्त्यात अचानकपणे तिच्यावर मागून रोहित यादव या २८ वर्षीय तरुणाने हल्ला केला. या हल्ल्यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला. या नराधमाने लोखंडी पान्याने १ नाही २ नाही तर चक्क १६ वार करत या (Brutal murder) तरुणीचा जीव घेतला. धक्कादायक म्हणजे तरुण तिच्यावर वार करत असताना नागरिक हे दृश्य पाहूनही काहीच न घडल्यासारखे पुढे जात होते. कोणीच आरोपीला थांबवले नाही.
दोन वर्षांचे नाते तुटले, दोघांचे ब्रेकअप झाले या रागात आरोपी होता. गेल्या काही वर्षांपासून ते शेजारी शेजारी राहत होते. (Crime News) गेल्या एक महिन्यांपासून त्यांच्यात वाद-विवाद होते. त्यामुळं त्यांचा ब्रेकअप झाला. पण आरोपीला संशय होता की तरुणीचे दुसऱ्या कोणासोबत प्रेमसंबंध होते. त्याच रागातून आरोपीने तिच्यावर इंडस्ट्रीअल पान्याने वार केले. आरोपीने तिच्यावर तब्बल 15-16 वेळा वार केले. या हल्ल्यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचे (CCTV video) सीसीटीव्ही व्हिडिओदेखील समोर आले आहेत. मुलीवर वार होत असताना एकाही नागरिकाने पुढे येऊन तिला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. काही नागरिक फक्त बघ्याची भूमिका घेत होते. जर नागरिकांनी आरोपीला विरोध केला असता तर आज कदाचित ती तरुणी जिवंत असती.
या घटनेवरून दिल्ली हत्याकांडाची (Vasai Massacre) पुनरावृत्ती झाल्याचं पाहायला मिळालं. वर्षभरापूर्वी दिल्लीत 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली होती. एकतर्फी प्रेमातून ही हत्या करण्यात आली होती. आरोपीने गजबजलेल्या वस्तीतच अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला केला. त्याने तिच्यावर तब्बल 40 वार केले. त्यानंतर चार वेळा तिच्या डोक्यात दगड घालून, तिची निर्घृण हत्या करण्यात आली. तेव्हाही हा गुन्हा घडत असताना नागरिकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती. कोणीही त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. जर लोकांनी वेळीच एकत्र येऊन आरोपींला थांबवले असते तर कदाचित तीचा जीव वाचला असता. (Vasai Massacre) वसईतील प्रकरणातही नागरिकांनी तिला थोडे सहकार्य केले असते तर कदाचित आज ती तरुणी जिवंत असती. या सगळ्या प्रकरणानंतर, ही वृत्ती कधी बदलणार असाच सवाल उपस्थित केला जात आहे.
दिवसाढवळ्या आणि बघ्यांच्या गर्दीत घडलेल्या या घटनेनंतर महिलांवरील जीवघेणे हल्ले थांबणार कधी? असा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. वसईतील हत्येच्या घटनेमधील आरोपी रोहित यादव याला (Vasai Police) पोलिसांनी अटक केली आहे. पण यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वसईमध्ये झालेल्या तरुणीची हत्या ही काळजाचा थरकाप उडवणारी आहे.दिवसाढवळ्या तरुणीची अशी हत्या होते, आणि लोक बघत राहतात हे सगळं चित्र विदारक आहे. महाराष्ट्राच्या राजधानीच्या जवळ इतकी गंभीर आणि भयंकर घटना घडणं हे महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे.