नागपूर(कुही):- मटकाझरीउमरेड तालुक्यातील कुही पोलीस स्टेशन हद्दीतील मटकाझरी गावातील मटकाझरी तलावात तीन जणांचा बुडून मृत्यू (Death by drowning) झाला. यातील दोघांचे मृतदेह रात्री 10 ते 11 च्या दरम्यान बाहेर काढण्यात आले, तर एकाचा शोध घेण्यासाठी बचावकार्य बराच वेळ सुरू होते. ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तलावात बुडून तिघांचा मृत्यू, सर्व मृत हे एकाच कुटुंबातील
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत हे एकाच कुटुंबातील असून ते पाचगाव सुरगाव येथील त्यांच्या शेतात आंबे तोळण्यासाठी आणि डब्बा पार्टी करण्यासाठी आले होते. यानंतर जितेंद्र आणि संतोष हे नेहमी मटकाझरी गावाजवळ एक तलाव आहे, ते तिथे जेवायला जातात आणि डब्बा पार्टी करतात, यामुळे उपस्थित सर्व जण तलावाजवळ डब्बा पार्टी करण्यास जाण्यास तयार झाले आणि तलावाजवळ डब्बा पार्टी करायला गेले. मात्र उन्हाचा तडाख्यामुळे यांची इच्छा तलावात आंघोळीची(bath) झाली. त्यामुळे जितेंद्र शेंडे, संतोष बावणे व निषेध राजू पोपट हे तिघेही खोल पाण्यात आंघोळीसाठी गेले. मात्र नजित नावाचा लहान मुलगा हा पाण्यात बुडाल्याने त्याला काहींनी बाहेर काढले. पण यात त्याचा मृत्यू (Death) झाला. त्यानंतर जितेंद्र व संतोष हेही पाण्यात हातपाय मारू लागले. यात त्यांचा बुडून मृत्यू झाला.
तलावात एकाच कुटुंबातील सात जणांचा बुडून मृत्यू
एक परिवार आंबे तोडायला आणि पार्टी करायला गेले असता यात तिघांना जलसमाधी मिळाली अशी माहिती मिळताच कुही पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पोलीस, ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या मदतीने तिघांचेही मृतदेह (dead body) बाहेर काढले .या आधी पण उमरेड तालुक्यातील कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मटकाझरी तलावात(Matkazari Lake) एकाच कुटुंबातील सात जणांचा बुडून मृत्यू झाला होता.
एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात तिघेही पाण्यात
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व जण गुरुवारी दुपारी पाचगाव सुरगावच्या शेतात आंबे तोडण्यासाठी आणि डब्बा पार्टी करण्यासाठी घरातून निघाले होते. यावेळी शेतात आंबे न मिळाल्याने ते मटकाझरी तलावात पार्टी करण्यासाठी पोचले असता तलावात आंघोळ करताना तिघेजण खोल पाण्यात गेले आणि एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात तिघेही पाण्यात बुडाले. गुरूवारी रात्री 10 ते 12 वाजेच्या दरम्यान गोताखोर (diver) जगदीश खैरे यांच्या मदतीने तिन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. सदर कार्यात उमरेड उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार, पोलीस निरीक्षक कुही चे भानुदास पिदुरकर, पोलीस उपनिरीक्षक देविदास ठमके, पो.ह.वा.दिलीप लांजेवार, हरिदास चाचरकर, अमित आजबले उपस्थित होते.