अनाथ बछड्याच्या संख्येत वाढ
तुमसर/भंडारा (Gorewada Calves) : गेल्या काही महिन्यांत वाघांच्या शिकारीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे विविध घटनांतून समोर आले आहे. त्यात लेंडेझरी वनपरिक्षेत्र अंतर्गत खापा- मांडवी जंगलात ११ फेब्रुवारी रोजी एक बछडा मृतावस्थेत आढळून आला तर दुसरा भुकेने व्याकूळलेल्या गंभिर अवस्थेत आढळून आला होता.त्याचा सुध्दा १२ फेब्रुवारी रोजी सकाळी (Gorewada Calves) गोरेवाडा नागपुर प्राणीसंग्रहालय उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
सदर दोन बछड्याच्या मृत्यूची शाही वाळते न वाळते परत १५ फेब्रुवारी रोजी सकाळी खापा-मांडवी जंगलात , तिन ते चार महिन्याचे बछडे भूकेने व्याकुळलेल्या गंभीर अवस्थेत आढळून आल्याने वनविभागत एकच खळबळ उडाली आहे.परिणामी येथे वनविभाग अँक्शन मोडवर आला आहे. तिन दिवसांपुर्वी दोन बछड्याचा मृत्यू झाला व परत शणीवारी खापा -मांडवी जंगलात दोन (Gorewada Calves) बछडे भूकेने व्याकुळलेल्या गंभीर अवस्थेत आढळून आल्याने त्या अनाथ बछड्याच्या (आई) वाघीणीची शिकारीची ? छाया गडद झाली आहे. येथे वाघाच्या बछड्याचे वाढते मृत्यूचे प्रमाण रोखण्याचे मोठे आव्हान वनविभागासमोर ऊभे ठाकले आहे.
तिन दिवसांपूर्वी दोन बछड्याचा मृत्यू
भुकेने व्याकूळलेल्या गंभीर अवस्थेत आढळून आलेल्या (Gorewada Calves) दोन बछड्याचा ११ व १२ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला होता. सदर घटनेच्या तिन दिवसांनंतर परत शनिवारी लेंडेझरी वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या त्याच आलेसुर -खापा-मांडवी जंगल परिसरात वन विभागाने लावलेल्या ट्रप कॅमेऱ्यात गंभीर अवस्थेतील तिन महिन्याचे अगदी आईच्या दुधारचे असलेले दोन बछडे परत आढळून आल्याने वनविभागत एकच खळबळ उडाली आहे.सदर गंभीर दोन्ही बछड्यांना गोरेवाडा (नागपुर)प्राणीसंग्रहालय उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
अनाथ बछड्यांच्या संख्येत वाढ
त्याच ज़गलातील यापूर्वी तिन दिवसांपूर्वी दोन बछड्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शनीवारी परत खापा -मांडवी जंगलात गंभीर अवस्थेत आईच्या दुधावचे दोन बछडे (Gorewada Calves) आढळून आल्याने वनविभागत एकच खळबळ माजली आहे. राज्यातील जंगलांत वाघांच्या अनाथ बछड्यांची व त्यांच्या मृत्यूची संख्या गेल्या काही महिन्यांत वाढली आहे. वाघिणींचाही (बछड्यांच्या आईचा) काहीच ठावठिकाणा लागत नसल्याने येथे त्या बहेलिया टोळी शिकाऱ्यांना वाघीण बळी पडल्याचा भितीवजा अंदाज वन्यजिव प्रेमी कडून व्यक्त केला जात आहे.
आईच्या दूधावरचे चार बछडे भरकटले
जेमतेम तिन- चार महिन्यांचे आईच्या खुशित बाळगणारे अगदी दुधावरचे चारही बछडे (आई)वाघीण पासुन भरकटले. यापूर्वी दोन बछड्यांचा मृत्यू झाला तर दोन गोरेवाडा प्राणीसंग्रहालय अतिदक्षता विभागात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. यातील चारही दुधावरचे बछडे वाघीणी पासुन भरकटले कसे? की वाघीणीची शिकार झाली? चार दिवासापासुन वाघीण आपल्या बछड्यांजवळ आली नाही का? (Gorewada Calves) चारही बछडे शारीरिक कमजोर असतील तर वाघीणने सोडले कसे? वाघीणीला सहवासात नर वाघ तर मिळाला नाही?वन विभागाच्या ट्रप कॅमेऱ्यात बछडे दिसले तर वाघीण दिसली नाही का? असे अनेक प्रश्न येथे उपस्थित होत आहेत.