आतापर्यंत १३ हजार ६२३ शेतकर्यांना बसला फटका!
गडचिरोली (Crop Damage) : यावर्षीच्या खरीप हंगामात (Kharif Season) निर्माण झालेली अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील १३ हजार ६२३ शेतकर्यांच्या ७३०३ .१५ हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका बसला आहे. अद्यापही पिकांचे पंचनामे सुरूच असून नुकसानीच्या क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये खरीप पिकांचे एकुण लागवडी खालील क्षेत्र हे १ लाख ९३८६५.६७ हेक्टर आहे. लागवड झालेल्या शेती पैकी १३ हजार ६२३ शेतकर्यांचे ७३०३.१५ हेक्टर शेतीचे नुक्सान झाले.
गडचिरोली तालुक्यामध्ये खरीप हंगामात १५२४९.०२ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली. लागवड झालेल्या शेतीपैकी २ हजार १३८ शेतकर्यांचे १४८४.७८ हेक्टर शेतीचे नुकसान झाले.
धानोरा तालुक्यामध्ये खरीप हंगामात २१२५९.५५ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली. लागवड झालेल्या शेतीपैकी २७० शेतकर्यांच्या १३०.०० हेक्टर शेतातील पिकांचे नुकसान (Crop Damage) झाले आहे.
चामोर्शी तालुक्यामध्ये खरीप हंगामात ३४०६९.९५ हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड करण्यात आली. लागवड झालेल्या शेतीपैकी २७९९ शेतकर्यांच्या १५७४.७० हेक्टर शेतातील पिकांना फटका बसला आहे.
मुलचेरा तालुक्यामध्ये खरीप हंगामात ९४८७.६५ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली. लागवड झालेल्या शेतीपैकी ३९ शेतकर्यांच्या १३.७० हेक्टर शेतातील पिकांना फटका बसला.
देसाईगंज तालुक्यामध्ये खरीप हंगामात ११६६६.८४ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली. यापैकी ४७७ शेतकर्यांच्या २१३.०५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.
आरमोरी तालुक्यामध्ये खरीप हंगामात २००२९.०६ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली. लागवड झालेल्या शेतीपैकी ५३८३ शेतकर्यांच्या २५७६.९८ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे.
कुरखेडा तालुक्यामध्ये खरीप हंगामात १७९१४.४७ हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड करण्यात आली आहे. लागवड झालेल्या शेतीपैकी ९०१ शेतकर्यांच्या २५७.६७ हेक्टर क्षेत्रातील पिकांना अतिवृष्टी व पुराचा फटका बसला आहे.
कोरची तालुक्यामध्ये खरीप हंगामात १०१६८.२७ हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड करण्यात आली. लागवड झालेल्या शेतीपैकी ५०४ शेतकर्यांच्या २७२.५९ हेक्टर शेतीचे नुकसान झाले.
अहेरी तालुक्यामध्ये खरीप हंगामात २०१९१.२९ हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड करण्यात आली. लागवड झालेल्या शेतीपैकी ४७६ शेतकर्यांच्या ४०३.५६ हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका बसला.
सिरोंचा तालुक्यामध्ये खरीप हंगामात १८०७५.४४ हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड करण्यात आली. लागवड झालेल्या शेतीपैकी ६२६ शेतकर्यांच्या ३७६.१२ हेक्टर शेतीचे नुकसान झाले.
एटापल्ली तालुक्यात खरीप हंगामात ६०३७.६४ हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड करण्यात आली.
भामरागड तालुक्यात ९७१६.४९ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली. या दोन्ही तालुक्यात कोणतेही नुकसान झाले नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
3 महिण्यात देसाईगंज तालुक्यात सर्वाधिक पाऊस!
१ जून ते २२ ऑगस्ट पर्यंत पडलेल्या पावसाचा विचार करता जिल्ह्यात देसाईगंज तालुक्यात सर्वाधिक १४०.७ % पावसाची नोंद झाली आहे. गडचिरोली तालुक्यात ८७.१ टक्के, धानोरा १०१.८ टक्के, आरमोरी १०८.७ टक्के, कुरखेडा १०९.७ टक्के, कोरची ११२.१ टक्के, चामोर्शी १०६.२%, मुलचेरा १२०.२%, अहेरी ९२.८%, सिरोंचा ७५.५%, एटापल्ली १०१.६% व भामरागड तालुक्यात १२१.६% पाऊस पडला आहे.




