कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या सुचनेनूसार जिल्हाधिकार्यांनी काढले आदेश
परभणी (Dhananjay Munde) : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले असून पिक विम्याच्या ऑनलाईन तक्रारीसाठी शेतकर्यांना येणार्या अडचणी लक्षात घेऊन कृषि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिलेल्या सुचनेनूसार जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी (Crop insurance) पिक विम्याच्या ऑफलाईन तक्रारी घेण्याचे आदेश काढले आहेत.
जिल्हा दौर्यावर असलेल्या कृषीमंत्र्यांकडे शेतकर्यांनी पिक विम्याची तक्रार दाखल करतांना येणार्या अडचणी सांगीतल्या. त्यानंतर (Dhananjay Munde) मुंडे यांनी तात्काळ जिल्हाधिकार्यांना याबाबत सुचना दिल्या. त्यानूसार जिल्हाधिकारी गावडे यांनी शेतकर्यांच्या ऑफलाईन तक्रार घेण्याची कार्यवाही करण्यासंदर्भात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, (Crop insurance) पीक विमा कंपनी आयसीआयसीआय लोम्बार्डच्या व्यवस्थापकांना आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील सर्वच महसुल मंडळात अतिवृष्टी झाली असून आतापर्यंत १३९.६ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील खरीपाचे जवळपास ८० ते ९० टक्के क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामुळे शेतकर्यांना ऑनलाईन ज्ञान नसणे, मोबाईल फोन नसल्यामुळे अडचणी येत आहेत. त्यामुळे कृषि अधिकारी यांचे पत्रानूसार ही कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या सुचनांचे तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.
पीक विमा कंपनीला दिले तात्काळ आदेश
जिल्हाधिकार्यांनी (Crop insurance) पिक विमा कंपनीच्या अधिकार्यांना शेती नुकसानीबाबतचे ऑफलाईन अर्ज घेण्याबाबत आदेश दिले आहेत. शेतकर्यांनी कृषि सहाय्यकामार्फत पिक विमा कंपनीकडे ऑफलाईन अर्ज सादर करावे, ज्यांनी ऑनलाईन अर्ज केलेला आहे त्यांनी ऑफलाईन अर्ज करण्याचे आवश्यकता नाही.