नागपूर (Crop Insurance) : मान्सून जवळ येऊन ठेपल्यामुळे खरीप हंगामातील (Kharif crops) सर्व महत्वाच्या पिकांची पेरणीची वेळ सुद्धा जवळ आलेली आहे. म्हणूनच क्षेमाने तिच्या दोन उदयोन्मुख (Crop Insurance) पीक विमा योजना, सुकृती आणि प्रकृती, देशभरातील 20 राज्यांत आणि 2 केंद्रशासित राज्यांत उपलब्ध झाल्याचे जाहीर केले. त्यामुळे देशाच्या जीडीपीत जवळपास 15% योगदान देणाऱ्या करोडो शेतकऱ्यांना क्षेमा प्रकृती आणि सुकृती विमा योजनेचा (Vima Yojana) चांगलाच फायदा होणार आहे.
क्षेमा सुकृती योजनेची (Kshema Sukriti Yojana) विविध राज्यांतील उपलब्धता शेतकऱ्यांसाठी एक वरदान आहे कारण आता फक्त 499 रुपये प्रती एकर या वाजवी किमतीत शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबातील विमायोग्य उत्पन्न असलेले सदस्य, जे मोफत नोंदणी करू शकतात. या योजनेचा लाभ घेऊन त्यांच्या शेतातील विविध पिकांचे रक्षण करू शकतील. हा पीक विमा विकत घेण्यासाठी शेतकऱ्यांना क्षेमाच्या भारतातील सर्वात पहिले आणि एकमेव सानुकूलित (Crop Insurance) पीक विमा मोबाइल अॅप मध्ये लॉगइन करावे लागणार आहे.
सुकृती विमा योजना शेतकऱ्यांना 9 संकटांच्या पूर्वनियोजित सूचिमधून 2 संकटे निवडण्याचा पर्याय प्रदान करते ज्यामध्ये एक प्रमुख संकट आणि एक किरकोळ संकटाचा समावेश आहे. संकट निवडीतील लवचिकतेमुळे हवामान, प्रदेश, शेताचे स्थळ, ऐतिहासिक आकृतीबंध इत्यादि घटकांवर आधारित दाट शक्यता असलेली संकटे निवडणे शेतकऱ्यांसाठी शक्य झाले आहे. चक्रवादळ, महापूर (जलप्रिय पिकांसाठी लागू नाही), पूर, गारपीट यांसारखी गंभीर संकटे आणि भूकंप, भूस्खलन, वीज पडल्यामुळे लागलेली आग, जंगली प्राण्यांचा हल्ला (बंदर, ससे, रानडुक्कर, हत्ती) आणि विमान अपघात यांसारख्या किरकोळ संकटांविरुद्ध (Kshema Sukriti Yojana) क्षेमा सुकृती विमा सुरक्षा प्रदान करते.