शेतकऱ्यांसह विनायक सरनाईक यांची जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे मागणी
चिखली (Crop insurance) : गेल्या अनेक दिवसा नंतर तारीख पे तारीख दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर रविकांत तुपकर यांच्या आक्रमक भुमिकेनंतर पिक विमा मिळाला परंतू आजही जिल्ह्यातील हजारो शेतकरी विमा (Crop insurance) मिळणेपासून वंचीत राहले आहेत. तर विमा रखडल्याचे दूसरे तिसरे कारण नसुन राज्य शासनाकडे खरीपचे 113.61कोटी त्याचप्रमाणे रब्बीचे 120.19कोटी असी एकून 233.83 कोटी राज्य सरकारचा हिस्सा रक्कम विमा कंपनीने मागणी करुण देखील प्राप्त नसल्याने रखडून पडले आहे.
शेतकऱ्यांची हेळसांड थांबविण्यासाठी कृषी विभाग व विमा कार्यालयात राज्य शासनाकडे हप्ता थकल्याचे बोर्ड लावा
यासाठी शेतकरी कृषी विभाग व विमा कंपनी कार्यालायत पैसे मिळणार कधी यासाठी चकरा मारत असल्याने याबाबत कृषी विभाग व विमा कंपनीने राज्य शासनाचा हिस्सा बाकी असल्याचे बोर्ड लावण्यात यावे अशी मागणी विनायक सरनाईक यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे तालुका कृषी अधिकारी चिखली यांच्या मार्फत केली आहे.तर पिक विमा रक्कम तातडीने देण्यात यावी,विमा कंपनीवर गुन्हे दाखल करण्यात यावे,अशी मागणी करण्यात आली आहे.मागण्यांची पुर्तता न झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सरनाईक यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला आहे.
मागील वर्षी सन 2023-24अंतर्गत प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांनी खरीप व रब्बी पिकाचा विमा काढला होता.असे असतांना शेतकऱ्यांनी आंदोलने केल्या नंतर राज्य स्तरावर जिल्ह्यातील नेत्यांनी बैठका घेतल्या तर (Crop insurance) विमा मंजुर असून तो खात्यावर पडण्याच्या अनेक तारखा शेतकऱ्यांना दिल्या होत्या परंतू त्यापैकी अनेक तारखी फसव्या निघाल्याने रविकांत तुपकर यांनी आक्रमक भुमिका घेतली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी तुपकरांनी सिंदखेडराजा येथे अन्नत्याग आंदोलन केले होते.तर राज्य शासनाने दिलेली तारखेवर सुद्धा पिक विमा न मिळाल्याने रविकांत तुपकर यांनी कृषी विभाग गाठुन मुक्काम आंदोलन केले होते.तर त्यानंतर शेतकऱ्यांनी पोलिस स्टेशनला दाखल केलेल्या तक्रारी नंतर शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम मिळाली होती.परंतू आता राज्य शासनानेच हिस्सा दिला नसल्याची बाब उघड झाली आहे.
तर शासनाकडे खरीप आणि रब्बीची 233.83 कोटी रुपये रक्कम प्रलंबित असल्याचे पत्र विमा कार्यालयात पिक विमा का मिळाला नाही विचारणा करावयास गेलेल्या शेतकऱ्यांना दाखवीले जात आहे.यामुळे आज येईल उद्या विमा (Crop insurance) येईल या अपेक्षेने शेतकरी चकरा मारत आहेत.तर ऐवढ्या बैठका घेतल्या घोषणा झाल्या परंतू अजून राज्य सरकारने विमा रक्कम कंपनीला दिली नसल्याने हि राज्य सरकारने आणि जिल्ह्यातील बैठकीतील नेत्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे म्हणत शेतकऱ्यांची हेळसांड थांबवण्यासाठी व झोपेत असलेल्या सरकारला जाग येण्यासाठी कृषी विभाग व विमा कार्यालयात हिस्सा बाकी असल्याचे फलक लावण्यात यावे ,अशी मागणी शेतकऱ्यांसह सरनाईक यांनी केली आहे.तर दोन दिवसात या प्रकरणी न्याय न मिळाल्यास विमा रक्कम शासनाने न दिल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी रविराज टाले, सतिष सुरडकर,संजय सोळंकी, संतोष सुरुशे,राजू महाले, सुदर्शन कराडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.