मानोरा(Washim):- कुपटा मंडळातील शेतकऱ्यांनी सन २०२३ – २४ मध्ये कपाशी पिकांचा पिक विमा काढला होता. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना कपाशी पिकाचा विमा मिळालेला नाही. त्यामुळे पिक विमा द्यावा, अशी मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना शेतकऱ्यांनी सादर केले आहे.
अतिवृष्टीच्या पावसामुळे कपाशी पिकांचे प्रचंड नुकसान
निवेदनात नमूद केले आहे की, मागील वर्षी माहे नोव्हेंबर मध्ये ढगफुटी सदृश अतिवृष्टीच्या(heavy rain) पावसामुळे कपाशी पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कपाशी नुकसानीचा ७२ तासात फोटो अपलोड करण्याचे विमा कंपनीला सुचना दिल्या होत्या, मात्र काही सूचना नजर चुकीने काढणी पश्चात नुकसान या बाबी अंतर्गत देण्यात आल्या. याबाबतची त्यावेळी शेतकऱ्यांना माहिती नव्हती. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे कपाशी पिकांचे नुकसान(damage) झाले आहे. त्या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा देण्यासंदर्भात लक्ष केंद्रीत करावे असे निवेदन दिले आहे. निवेदन देतेवेळी शेतकरी अतिक भाई, वाळके, नागोराव राठोड, धर्मेंद्र श्यामसुंदर, चंद्रकांत घोडे व मारोती कालेकर हे उपस्थित होते.