तुमसर (Crops damage by Wild boar) : रोही व रानडुक्कराने (Wild boar) शेतमालाचे नुकसान केल्यास (forest department) वनविभागाकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते. परंतु रोही व रानडुक्कराचा कायमचा बंदोबस्त करता येत नव्हता. तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना प्राण्यांना मारण्याचे अधिकार नव्हते. परंतु राज्याच्या महसूल व वनविभागाकडून रोही व रानडुकरांकडून शेतमालाचे नुकसान झाल्यास व शेतकऱ्यांनी अर्ज केल्यास त्यांना ठार मारण्याकरिता २४ तासांच्या आत परवानगी दिली जाणार आहे.
वनविभागात करावा लागणार अर्ज
यापूर्वी बंदुकीद्वारे शिकार करण्याकरिता अनुभवी व्यक्ती मिळत नव्हते. रोही व रानडुक्कर (Wild boar) ठार झाल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्याचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागत होता. वनपरिक्षेत्र अधिकारी यांना वन्यप्राणी विल्हेवाट करण्याबाबत अधिकार नव्हते. त्यामुळे ठार करण्याची सदर कार्यपद्धती व्यवहारी ठरत नसल्याचे (forest department) वनविभागाच्या लक्षात आले. त्यामुळे त्यात नुकतीच सुधारणा करण्यात आली.
रानडुक्कर किंवा रोहा (Wild boar) या वन्यप्राण्यांने शेतातील पिकांचे नुकसान केले. शेतकऱ्यांने याबाबत संबधित वनक्षेत्रपालांकडे लेखी स्वरूपात अर्ज देऊन त्याची पोचपावती घ्यावी लागणार आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबधित वनक्षेत्रापाल शहानिशा करत शेतमालाचे नुकसान करणाऱ्या रोही व रानडुक्कराला मारण्याकरीता २४ तासांच्या आत वनविभाग परवानगी देणार आहे.