हिंगणघाट (Sarki Godown fire) : येथील नांदगाव रोडवर असलेल्या सरकी गोदामामध्ये आज २६ एप्रिल रोजी पहाटे आग लागली. त्यात गोदामामध्ये भरून असलेली ९००० क्विंटल सरकी जळून खाक झाल्याने सुमारे चार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वृत्तलिहेपर्यंत (Sarki Godown fire) आगीवर नियंत्रण करण्यासाठी युद्ध स्तरावर प्रयत्न सुरू होते. घटनास्थळी सात अग्निबंब आगीवर नियंत्रण करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करीत होते.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, येथील शांती इंडस्ट्रीज या ऑइल मिलच्या मालकीची ९००० क्विंटल (Sarki Godown fire) सरकी सदर गोदामामध्ये विविध क्षेत्रात साठवणूक करून ठेवण्यात आली होती. नांदगाव बोरगाव परिसरातील या गोदामामध्ये पहाटेच्या सुमारास आग लागल्याचे सुरक्षा रक्षकांना दिसले. त्यांनी त्वरित या संबंधात शांती इंडस्ट्रीजचे मालक डॉक्टर श्याम अग्रवाल व विजय टिबलेवाल यांना त्वरित सूचना केली.
ते घटनास्थळी पोहोचताच त्यांनी आगीवर नियंत्रण करण्याकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीचे अग्निशमन दल व नगरपरिषदचे अग्निशमन दल यांना सूचना केल्या. एक तासात दोन्ही अग्निशामक घटनास्थळी पोहोचले. परंतु (Sarki Godown fire) आगीचा स्वरूप फार मोठा असल्याने आगीवर नियंत्रण होत नसल्याने शेवटी राळेगाव, पुलगाव, सिंदी (रेल्वे), सेलू, देवळी व इतर ठिकाणावर सुद्धा अग्निशामक बंब व दल त्वरित बोलविण्यात आले. तालुका प्रतिनिधी
स् आगीवर नियंत्रण करण्यासाठी जेसीबीने गोदामाच्या काही भिंती तोडण्यात आल्या. या (Sarki Godown fire) आगीमध्ये गोदामामध्ये साठवणूक केलेल्या संपूर्ण नऊ हजार क्विंटलचा सरकीच्या साठ्याची राखरांगोळी झाली. त्यामुळे जवळपास चार कोटी रुपये नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
घटनास्थळी नांदगाव परिसरातील उद्योजक वर्ग यांनी आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी संपूर्ण सहकार्य केले. (Sarki Godown fire) आगीची सूचना मिळताच येथील तहसीलदार शिंदे, बाजार समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी, पोलीस अधिकारी व महसूल विभागाचे तलाठी यांनी घटनास्थळी भेट दिली.




