हिंगोली(Hingoli):- राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास 16 उंटाची एकाच आयशर वाहनातून निर्दयपणे अवैधरित्या कोंबून वाहतूक करताना पोलीस पथकाने रात्री गस्त दरम्यान वाहन पकडले. सदर प्रकरणी 21 लाख 47 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करून शुक्रवारी पहाटे मध्यप्रदेशातील तिघाविरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल (Filed a case) करण्यात आला.
आयशर वाहन व उंटांसह 21लाख 47 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त
जिल्हा पोलीस प्रमुख जी.श्रीधर, पोलीस उपाधीक्षक मारोती थोरात मार्गदर्शनात रात्री सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार, पोलीस उपनिरीक्षक सुबरवाड, शिवाजी पवार, प्रवीण चव्हाण, राजेश मुलगीर पोलीस पथक महामार्गावर गस्त करत असताना जरोडा शिवारातील टोल नाक्यावर त्यांनी आयशर वाहन तपासणी केली असता एकाच वाहनात तब्बल 16 उंटांना निर्दयपणे दुखापत होईल आसे कोंबून वाहतूक परवाना(Transport license) नसताना अवैध वाहतूक(Illegal traffic) करताना आढळून आल्याने पोलीस कर्मचारी शिवाजी पवार फीर्यादीवरून रविकांत कोमल भारती चालक मालक ढोलाना खु ता.बदनापूर जिल्हा धार मध्यप्रदेश व त्याच्या सोबत आसलेले भिमराव बदु राठोड रा.आंदेगाव ता.मुखेड जिल्हा नांदेड, रोहित बाबुलाल परिहार रा.आवर ता.पंचपाळ जिल्हा जलवाड मध्यप्रदेश (Madhyapradesh)तिघाविरुद्ध गुन्हा दाखल करून 21लाख 47 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, बिटप्रमुख शेख अन्सार पुढील तपास करत आहेत.
प्रथमच उंट पकडले..
महामार्गावर कळमनुरी तालुक्यातील विविध भागात व इतरत्र यापूर्वी अनेकदा जनावरांची अवैध वाहतूक करताना वाहने पकडले परंतु पहिल्यांदाच एकाच वाहनातून तब्बल 16 उंटाची वाहतूक करताना वाहन पकडले आहे. शुक्रवारी सकाळी पोलीस स्थानक आवारात उंट होते बरीच लहान मुल उंट येउन पाहत होती.