चंद्रपूर (Tadoba-Andhari Tiger Reserve) : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प भारतातील प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्पापैकी एक असून जगभरातील व देशातील निसर्ग पर्यटक या वनाचा आणि वन्यजीवांचा आनंद उपभोगण्याकरिता या (Tadoba-Andhari Tiger Reserve) व्याघ्र प्रकल्प क्षेत्रामध्ये येतात.
याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील निसर्ग पर्यटकांना अल्प दरामध्ये या वनाचा आनंद घेण्याकरिता वर्ष २०२३ मध्ये क्रुझर सेवा सुरु करण्यात आली होती. पर्यटकांचा ओघ बघता मोहर्ली गेट मार्फत ४ व कोलारा गेट मार्फत ३ अशा एकूण ७ क्रुझर मार्फत कोर क्षेत्रात पर्यटन सेवेकरिता उपलब्ध करून देण्यात आले होते.
सदर सेवेमार्फत स्थानिक जिल्ह्यातील निसर्ग पर्यटक, सामान्य नागरिक यांना ताडोबा सफारीचा आनंद मनमुराद मिळत आहे. वर्ष २०२३ ते वर्ष २०२५ पर्यत ५८००० निसर्ग पर्यटकांनी या क्रुझरद्वारे (Tadoba-Andhari Tiger Reserve) ताडोबा सफारीचा अनुभव घेतला आहे. सदर उपक्रमाच्या माध्यमातून वने व वन्यजीवाविषयी जनजागृती सुद्धा सामान्य नागरीकामध्ये होत आहे हे विशेष.
सदर उपक्रमाची यशस्वीता बघता चंद्रपूर जिल्हातील पर्यटकांना चंद्रपूर ते मोहार्ली येथे सकाळी व दुपार सफारी जाणे-येणे करण्यासाठी अडचण जात होती. ही बाब लक्ष्यात घेऊन (Tadoba-Andhari Tiger Reserve) ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने तसेच आ. किशोर जोरगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली क्रुझर पर्यटकांकरिता चंद्रपूर ते मोहर्ली ४० सीटर बस उपलब्ध करण्यात आली असून दि. १ जून २०२५ ला आ. जोरगेवार यांच्या हस्ते बस सेवेचे उद्घाटन पार पडले.
सदर बसमार्फत सकाळच्या सफारीकरिता ४.३० वाजता व सफारी पूर्ण झाल्यानंतर सकाळी १० वाजता चंद्रपूर परत येणार त्याचप्रमाणे दुपारच्या सफारी करिता २ वाजता तर परत ७.३० वाजता चंद्रपूर ला पर्यटकांन सोडणार आहे. सदर बससेवा उपसंचालक (कोर) कार्यालय, (Tadoba-Andhari Tiger Reserve) ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, रामबाग वनवसाहत, मुल रोड, चंद्रपूर येथून प्रस्थान करणार आहे.