रविवारला पारितोषिक वितरण
अमरावती (Cultural festival) : जिल्हा परिषद अधिकारी (Amravati Zilla Parishad) व कर्मचारी विभागीय क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवात कराओके, समुहगीत, भक्तीगीत, भावगीत, लोकगीत, सिनेगीत, अभिनय, हास्यजत्रा व आदिवासी नृत्याने धमाल उडविली. विविध कलाविष्काराला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्र यांच्या सुमधुर गीताने प्रेक्षकांची वाहवा मिळविली.
जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवात कलाविष्कारांची रंगतदार अद्वितीय मेजवानी
जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी विभागीय क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव (Cultural festival) येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या पटांगणात सुरू आहे. दरम्यान येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात गुरुवारी (ता.३०) सांस्कृतीक कार्यक्रम उत्साहात झाला. या (folk festival) कार्यक्रमात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कराओके गीत, समुह नृत्य, भक्तीगीत, भावगीत, लोकगीत, सिनेगीत, अभिनय, हास्य जत्रा असे बहारदार कार्यक्रम सादर केले. यानिमित्ताने (Cultural festival) सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निमित्ताने अधिकारी व कर्मचारी यांनी कलेचा आविष्कार सादर केला. तसेच समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केले. दरम्यान या महोत्सवाचा बक्षीस वितरण सोहळा रविवारला (ता.२) होणार आहे.
कराओके, समुहगीत, भक्तीगीत, भावगीत, लोकगीत, सिनेगीत, अभिनय, हास्यजत्रा व नृत्याने वेधले लक्ष
सांस्कृतिक कार्यक्रमात (Cultural festival) जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्र, (Amravati Zilla Parishad) जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा क्रीडा सचिव बालासाहेब बायस, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी अश्विनी मारणे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील जाधव, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड, कृषिविकास अधिकारी मलप्पा तोडकर, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डाॅ. अरविंद मोहरे, उपशिक्षणाधिकारी बुध्दभूषण सोनोने यांनी सहभाग नोंदवून कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढविला.
सिईओ संजीता मोहपात्र यांच्या गीताला प्रेक्षकांची दाद
दरम्यान, अंजनगाव सुर्जी, मोर्शी, अधिकारी वर्ग, चांदुर रेल्वे, दर्यापूर, चिखलदरा, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, तिवसा, भातकुली,धारणी,अचलपूर, मुख्यालय, अमरावती, चांदुर बाजार, वरुड या पंचायत समितीमधील अधिकारी कर्मचारी यांनी कराओके, समुहगीत, भक्तीगीत, भावगीत, लोकगीत, सिनेगीत, अभिनय, हास्यजत्रा व नृत्य सादर करून कलाविष्कारांची रंगतदार मेजवानी दिली. संचालन शेख शकील,सुरेश चिमणकर, दिपीका भारती यांनी केले. अशी माहिती क्रिडा संयोजक डाॅ.नितिन उंडे, सहसंयोजक पंकज गुल्हाने यांनी दिली. असे (folk festival) क्रिडा महोत्सव (Sports festival) प्रसिध्दी समितीचे विनायक लकडे, शकील अहमद, राजेश सावरकर, श्रीनाथ वानखडे यांनी कळविले आहे.
सी. ई. ओ. संजिता मोहपात्र याच्या गीताने वेधले लक्ष
जिल्हा परिषदेच्या (Amravati Zilla Parishad) प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्र यांनी या क्रीडा व (folk festival) सांस्कृतिक महोत्सवात मधुर आवाजात गीत सादर केले. उपस्थितांनी या गीताला उस्फुर्त जोरदार दाद दिली.
अधिकाऱ्यांचा कार्यक्रमात सक्रिय सहभाग
या (Cultural festival) महोत्सवात बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड, अचलपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधीर अरबट, तिवसा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी तथा क्रीडा संयोजक नितीन उंडे, वित्त विभागातील लेखाधिकारी मधुसूदन ईचक्के, संजय नेवारे यांच्यासह आदी अधिकाऱ्यांनी आपली कला सादर करून कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला.
प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करून समाजाचे वेधले लक्ष
या (Cultural festival) महोत्सवात प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करून समाजाचे लक्ष वेधून संदेश देण्यात आला. नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीच्या ‘नारी शक्ती अवतार काली’ या समूह नृत्याने (folk festival) सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली. धामणगाव पंचायत समितीचे ‘ नारी उठा तलवार ‘, चिखलदरा पंचायत समितीचे समूह नृत्य, अंजनगाव सुर्जी आदिवासी नृत्य, चांदुर बाजारच्या ‘सत्यम शिवम सुंदरम’ कराओके गीत, अचलपूर पंचायत समितीचे शेतकरी व सैनिकांना समर्पित समूह नृत्यासह विविध नृत्याला उपस्थितांनी दाद दिली.