बँकेच्या शाखाधिकारीकडे तक्रार
मानोरा (customer service center) : तालुक्यातील शेंदूरजना आढाव येथे विविध (customer service center) शाखेच्या बँक असल्याने परिसरातील नागरिक दैनंदिन व्यवहार व कामकाजासाठी येतात. या ठिकाणी खापरदरी, गिर्डा येथील सेतू केंद्राची परवानगी त्यांच्या गावापुरती असताना विनापरवानगी शेंदूरजना येथे ग्राहक सेवा केंद्र चालवून नागरिकांची लूट करीत आहे. तसेच बँकेचे एजंट म्हणून सुध्दा काम करीत आहे. याबाबत चौकशी करून कार्यवाही करावी, असे निवेदन स्टेट बँकेचे शाखाधिकारी यांना निवेदन रमेश गोरसिंग पवार यांनी दिले आहे.
मौजे खापरदरी (गिर्डा ) येथील सेतू चालक देविदास राठोड व अशोक राठोड हे ग्राहकांकडून नियमबाहय एका हजारावर १५० ते २०० रू कमिशन घेत आहे. त्यामुळे स्टेट बँक यांनी दिलेली कमिशनची परवानगी रद्द करावी तसेच ग्राहक सेवा केंद्र चालविताना अरेरावीची वागणूक देतात. (customer service center) नागरिकांचे अर्जंट काम असल्यास ते काम आज होणार नाही तुम्ही दोन चार दिवसांनी येऊन पाहावे, नाहीतर तुम्हाला जेथे जायचे आहे. तिथे जा, आणि तुम्हाला काय करायचे ते करुन घ्या, अशी धमकी वजा दादागिरी व गुंडगिरी करुन नागरिकांची लूट करत महिलांना व नागरिकांना शासनाचे नियमाप्रमाणे वागणूक देत नाही अशी रितसर तक्रार भिलडोंगर येथील जेष्ठ नागरिक पवार यांनी दिली आहे.