चिखली तालुक्यात शाळेवरील टिन उडाले, जनजीवन विस्कळित
चिखली (Buldhana) : चिखली तालुक्याला (Chikhali taluka) अचानक आज दुपारी दोन वाजेच्या दरम्यान (Heavy rains) मेघ गर्जनेसह चक्रीवादळाचा तडाखा बसला. त्यामध्ये एका शेतकरी महिला विजेच्या धक्क्याने गंभीर जखमी झाली. तर शाळेवरील टिन उडाले, झाडे व विद्युत पोल कोसळल्याने जनजीवन विस्कळित झाले. चिखली तालुक्यातील (Chikhali taluka) मेरा बु. येथील अल्पभूधारक शेतकरी महिला अन्नपूर्णा कोंडूबा शेळके (वय ६५) यांचे गावालगत गट नंबर ७८० मध्ये कोरडवाहू दोन एकर जमीन आहे. या जमिनीवर कुंटूबाचा उदरनिर्वाह भागत नसल्याने त्यांनी जोडधंदा म्हणून, दोन म्हशी घेवून दुग्ध व्यवसाय सुरू केला .
या म्हशींना चारापाणी करण्यासाठीं ही महिला शेतात गेली. अचानक दुपारच्या सुमारास मेघ गर्जनेसह अचानक वादळी वाऱ्यासह (Heavy rains) गारांचा पाऊसास सुरवात झाली. वाऱ्याचा जोर इतका होता की, १५ मिनिटातच चक्रीवादळ निर्माण झाले. त्यामध्ये महिलेच्या अंगावर विज पडली आणि महिला बेशुध्द होऊन जमिनीवर पडली. हा प्रकार शेजारी असलेल्या पवण पडघान हा धावत आला आणि सदर प्रकार पाहून त्यांचा मुलगा भगवान शेळके यांना फोन लावून बोलावले. चार ते पाच जणांनी तात्काळ डॉ. जहीर पटेल येथे आणले. डॉक्टरांनी गंभीर जखमी पाहून (Chikhali taluka) चिखली येथील डॉ. सावजी यांच्या दवाखान्यात पाठविले. त्याठिकाणी महिलेवर उपचार सुरू आहेत. तसेच बोरगाव वसु येथील (Zilla Parishad School) जिल्हा परिषद शाळेवरील टिन उडाले असून, परिसरात ठिकठीकाणी विद्युत पोल, मोठ मोठी झाडे, घरवरचे टिन कोसळल्याने जनजीवन विस्कळित होवून गेले आहे.