कोलकाता (Cyclone Remal) : चक्रीवादळ रेमाल रविवारी रात्री पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकण्यापूर्वी बंगालच्या उपसागरावर गडद ढग घिरट्या घालत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या (Cyclone Remal) एक मिनिटाच्या व्हिडिओमध्ये ढगांचा जाड थर एक वर्तुळ बनवताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये जोरदार वारेही वाहताना दिसत आहेत. (Meteorology Department) भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) च्या मते, चक्रीवादळ रेमन (Cyclone Remal) बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीवर आदळल्यानंतर उत्तरेकडे सरकायला सुरुवात केली. रेमन चक्रीवादळ रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास बंगालमध्ये पोहोचले. सोमवारी चक्रीवादळ हळूहळू कमकुवत होत असल्याचे IMDने म्हटले आहे.
चक्रीवादळ उत्तर-ईशान्येकडे सरकण्याची शक्यता
बांग्लादेशच्या किनारपट्टीवर (Bangladesh) आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर (Cyclone Remal) चक्रीवादळ 40 किमी, कोलकाताच्या 90 किमी पूर्वेस, कॅनिंगच्या 90 किमी ईशान्येस आहे. प्रणाली सुरुवातीला उत्तर-वायव्य दिशेने सरकली आहे. पूर्वेकडे, नंतर उत्तर-पूर्वेकडे जाणे आणि हळूहळू कमकुवत होणे. चक्रीवादळामुळे (Cyclone Remal) पश्चिम बंगाल आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे अधिकाऱ्यांनी गेल्या दोन दिवसांत 10 लाखांहून अधिक लोकांना बाहेर काढले. पश्चिम बंगाल, ओडिशा आणि लगतच्या भागात रविवारी जोरदार वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक भागात पाणी साचले. माहितीनुसार, कोलकाता येथे पावसाशी संबंधित घटनांमध्ये तीन जण जखमी झाले आहेत.
बांगलादेशात ‘रेमाल’ चक्रीवादळाचा प्रभाव
हवामान खात्याने (Meteorology Department) 27 आणि 28 मे रोजी आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम, मणिपूर आणि त्रिपुरा येथे बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, चक्रीवादळ रेमलच्या संभाव्य प्रभावाच्या पार्श्वभूमीवर IMD ने त्रिपुरातील दोन जिल्ह्यांमध्ये ‘रेड’ अलर्ट जारी केला. रेमाल चक्रीवादळामुळे (Cyclone Remal) बांगलादेशच्या किनारपट्टीवर ताशी 120 किमी वेगाने विनाशकारी वारे वाहू लागले. किमान सात लोक मरण पावले आणि लाखो लोक 12 तासांपेक्षा जास्त काळ वीजविना राहिले. चक्रीवादळाचा बरिसाल, भोला, पटुआखली, सतखिरा आणि चट्टोग्राम सारख्या भागांना जोरदार फटका बसला.
Cyclone Remal ya Rumal, kuch bhi ho, kal tak gayab ho jayega! Dhyan rakhna, kal sab kuch normal ho jayega. Aaj thoda hawa hawaai chal raha hai, par kal fir se masti ki hawa chalegi! 😄🌪️#CycloneRemal pic.twitter.com/QijdE8QVWj
— CYCLONE CENTRAL (@CYCLONECENTRAL4) May 27, 2024