वयाच्या 18 व्या वर्षी 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती
नवी दिल्ली/सिंगापूर (D Gukesh) : भारताच्या डी गुकेशने बुद्धिबळाच्या विश्वात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. वयाच्या 18 व्या वर्षी डी गुकेशने चीनचा दिग्गज बुद्धिबळपटू डिंग लिरेनचा पराभव करून जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनचा (World Chess Champion) किताब पटकावला. या विजयासह गुकेशने 138 वर्षे जुन्या बुद्धिबळ परंपरेतील सर्वात तरुण विश्वविजेता बनण्याचा विक्रम रचला आहे.
Historic and exemplary!
Congratulations to Gukesh D on his remarkable accomplishment. This is the result of his unparalleled talent, hard work and unwavering determination.
His triumph has not only etched his name in the annals of chess history but has also inspired millions… https://t.co/fOqqPZLQlr pic.twitter.com/Xa1kPaiHdg
— Narendra Modi (@narendramodi) December 12, 2024
गुकेशने वयाच्या 18 व्या वर्षी रचला इतिहास
गुकेशने 14व्या गेममध्ये डिंग लिरेनचा पराभव करून बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वात तरुण विश्वविजेता ठरला. हा विजय केवळ त्याच्यासाठीच नाही तर भारतातील बुद्धिबळप्रेमींसाठीही अभिमानास्पद क्षण आहे. (D Gukesh) गुकेशच्या या यशामुळे बुद्धिबळातील (World Chess Champion) भारताचे स्थान आणखी मजबूत होईल. त्याने आपले बुद्धिबळातील प्रभुत्व जगभर दाखवून दिले आहे.
Victory of Gukesh D : A Beacon for Young Dreamers Across India!
Heartfelt congratulations to Gukesh D for the extraordinary achievement for becoming the youngest chess champion and winning the 2024 FIDE World Championship in Singapore! At the age of 18, your relentless hard… pic.twitter.com/SY2uVn0Frb
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 12, 2024
विश्वनाथन आनंदनंतर विजेतेपद पटकावणारा दुसरा भारतीय
या ऐतिहासिक विजयासह, भारतीय बुद्धिबळपटू डी गुकेशने विश्वनाथन आनंदनंतर भारताचा दुसरा बुद्धिबळ विश्वविजेता (World Chess Champion) होण्याचा मान मिळवला. सिंगापूर येथे झालेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात (D Gukesh) डी गुकेशने चीनच्या डिंग लिरेनचा 7.5-6.5 अशा फरकाने पराभव करून विजेतेपद पटकावले.
In a game of 64 squares, you've opened a world of endless possibilities. Congratulations, @DGukesh, on becoming the 18th World Champion at just 18! Following in Vishy’s footsteps, you're now guiding the next wave of Indian chess prodigies. 🇮🇳♟️🏆
pic.twitter.com/3kPCzGEv1d— Sachin Tendulkar (@sachin_rt) December 12, 2024
वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी मिळते एवढी रक्कम
डी. गुकेशला (D Gukesh) वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर 11.45 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली आहे. अंतिम फेरीत पराभूत झालेल्या डिंग लिरेनला 9.75 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. याशिवाय या स्पर्धेतील प्रत्येक गेम जिंकण्यासाठी 1.69 कोटी रुपयांचे बक्षीसही देण्यात आले होते, जे या बुद्धिबळ स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे खेळाडूंना मिळते.
T 5222 – Gukesh D world champion chess .. the youngest in the World ..
you have made us all so proud .. 🇮🇳🇮🇳🇮🇳
because of you the entire World salutes INDIA ..
JAI HIND pic.twitter.com/lx8LgFyRfl— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 12, 2024
जाणून घ्या…डी गुकेशची एकूण संपत्ती किती?
गुकेशने (D Gukesh) बुद्धिबळात नुकत्याच मिळवलेल्या यशामुळे त्याच्या संपत्तीतही वाढ झाली आहे. तीन मोठ्या स्पर्धा जिंकल्यानंतर त्याने करोडो रुपयांची बक्षिसे जिंकली. वर्ल्ड चॅम्पियन (World Chess Champion) होण्यापूर्वी त्याची एकूण संपत्ती 8.26 कोटी रुपये होती, मात्र आता त्याची एकूण संपत्ती 20 कोटींच्या पुढे गेली आहे. बुद्धिबळ स्पर्धा आणि जाहिरातींमधून मिळणारी बक्षिसे हा त्याच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे.