सहस्त्रचंद्रदर्शन अभिष्टचिंतन सत्कार साेहळा
अमरावती (Dadasaheb Gawai) : दिवंगत दादासाहेब गवई यांच्या मार्गदर्शनातून आपली वाटचाल झाली आहे. आयुष्याचे 81 वर्ष पूर्ण केेले आहेत. आतापर्यत समाजासाठी कार्य केले. विपश्यनेद्वारा राग, लाेभ, द्वेष हद्दपार झाले आहेत. यापुढे देखील वृक्षाराेपण, विपश्यनासह विविध सामाजिक कार्य सुरु ठेवण्याचा आपला संकल्प असल्याचे माजी लेडी गव्हर्नर कमलताई गवई (Kamaltai Gavai) यांनी म्हटले. आपल्या सहस्त्रचंद्र दर्शन सत्कार साेहळ्याला उत्तर देतांना त्या बाेलत हाेत्या.
कमलताई गवई सहस्त्रदर्शन अभिष्टचिंतन साेहळा कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अध्यक्षस्थानी माजी आमदार बी.टी. देशमुख, समाजसेवी गिरीश गांधी, खासदार बळवंत वानखडे, खासदार डाॅ. अनिल बाेंडे, आमदार व माजी मंत्री अॅड. यशाेमती ठाकूर (Yashamati Thakur), आ. सुलभा खाेडके, आ. बच्चू कडू, अविनाश दुधे, बाळ कुळकर्णी, एस.एस. राव, प्राचार्य कमलाकर पायस आदी उपस्थित हाेते. पुढे बाेलतांना कमलताई गवई (Kamaltai Gavai) म्हणाल्या की, आपणास दादासाहेब यांच्या विषयी सुरुवातीपासून प्रचंड आदर हाेता. त्यांना हार घालून त्यांचा सत्कार करावा, ही इच्छा हाेती. 1959 साली जाेग चाैक येथे दादासाहेबांच्या अर्धांगिणी हाेण्याचे साैभाग्य लाभले. दादासाहेब हुशार व्यक्तीमत्व हाेते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार सर्वसामान्यांमध्ये पाेहाेचविण्याचे कार्य करणारे कर्मवीर भाऊराव गायकवाड यांच्यासाेबत दादासाहेब (Dadasaheb Gawai) यांनी कार्य केले. रिपब्लिकन पार्टी ऑ\ इंडीयाच्या झेंड्याशी ते प्रामाणिक राहीले.
त्यांच्याशी संसार करतांना माझ्या क्षमतेप्रमाणे मी मुलांवर संस्कार केले. न्यायमूतीं भूषण गवई, डाॅ.राजेंद्र गवई व किती अर्जुन यांना चांगले संस्कार दिले. दादासाहेबांनी समाजाचे पालकत्व स्विकारले हाेते. त्यामुळे आपण मुलांचे व घरी येणाèया प्रत्येकांचे पालकत्व स्विकारले. आजवर आपण अनेकांचे सत्कार केले आहेत. परंतु माझे दीर गिरीश गांधी यांनी या कार्यक्रमाची माहीती दिली. त्यास नकार देता आला नाही. या सत्कारामुळे आपणास नवसंजीवनी मिळाली आहे. (Dadasaheb Gawai) दादासाहेबांच्या आठवणी सांगतांना त्या म्हणाल्या, लग्नानंतर आपण पुढील शिक्षण घेतले. तत्पूर्वी आपले केवळ दहावीपर्यतचे शिक्षण झाले हाेते. परंतु आचार्य पदापर्यतचा शैक्षणिक प्रवास दादासाहेबांच्या प्रेरणा व मार्गदर्शनातून झाल्याचे त्यांनी सांगितले.
आगामी काळात ऑक्सीजनची कमतरता जाणवणार आहे. त्यामुळे समाजाने आता जागृत झाले पाहिजे. आपण वृक्षाराेपणासाठी पुढाकार घेतला आहे. दरराेज वृक्षाराेपण करण्यात येत आहे. वृक्षाराेपणाची चळवळ मजबूत व्हावी असा आपला मानस आहे. अमरावतीकर यात पुढे येतील असे त्यांनी म्हटले. संघर्ष ही यशाची जननी आहे. आयुष्यात संघर्ष अनुभवला आहे. आपल्या तिनही मुलांनी संघर्ष बघितला आहे. समाजाने आम्हास माेठी साथ दिली. त्यामुळे या सत्कार साेहळ्याच्या निमित्ताने समाजासाठी झटत राहण्याचा आपला संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी, आभार प्रदर्शन अविनाश दुधे यांनी केले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील गणमान्य नागरिक उपस्थित हाेते.
पराेपकाराची भावना रुजविली : न्यायमूर्ती भूषण गवई
आचार्य कमलताई गवई (Kamaltai Gavai) यांच्या सहस्त्रदर्शन अभिष्टचिंतन साेहळ्यात मनाेगत व्यक्त करतांना सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई म्हणाले की, आपले वडील दादासाहेब व आई कमलताई यांनी आम्हा तिनही भावंडात पराेकाराची भावना रूजविली आहे. आपण वकीली करावी की न्यायाधीश व्हावे या द्वंदात असतांना दादासाहेबांनी आपणास न्यायदानाचे कार्य करण्याची प्रेरणा दिली. त्यामुळेच आपण न्यायदानाचे कार्य करीत आहे. आईंचे संस्कार आपल्या आयुष्यासाठी माेठे आहेत असे ते म्हणाले. यावेळी किर्ती अर्जुन यांनी विचार मांडतांना आई व दादासाहेब यांनी आपणास घडविल्याचे सांगितले. घरातील राजकीय व सामाजिक परिस्थिती लक्षात घेता घरी नेहमीच गर्दी असायची. त्यामुळे घरी येणारा प्रत्येकजण महत्वाचा असायचा. आई व दादासाहेबांनी समाजासाठी परिश्रम घेतांना आम्हाला घडविले. त्यांच्या विचार व प्रेरणेतून आम्हाला आयुष्याचा नवा मार्ग लाभल्याच्या त्या म्हणाल्या. यावेळी डाॅ. राजेंद्र गवई देखील उपस्थित हाेते.
दादासाहेबांच्या कार्याला कमलताईंचे बळ : बी.टी. देशमुख
आज स्मृतिशेष दादासाहेब गवई (Dadasaheb Gawai) यांच्या अर्धांगिनी आचार्य कमलताई गवई यांचा सहस्त्रचंद्रदर्शन अभिष्टचिंतन साेहळा हाेत आहे ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. कमलताई यांचे कार्यात माेठे आहेे. दिवंगत दादासाहेब गवई यांच्या कार्याला त्यांनी माेठे बळ दिले आहे. त्यामुळे यापुढे देखील समाजासाठी त्या कार्य करीत राहतील अशा आपण शुभेच्छा देत असल्याचे माजी आमदार बी.टी. देशमुख यांनी म्हटले. आचार्य कमलताई गवई यांच्या अभिष्टचिंतन साेहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बाेलत हाेते. पुढे बाेलतांना ते म्हणाले की, अमरावती जिल्ह्याला कर्तृत्ववान व्यक्तीमत्व लाभले आहे. त्यामध्ये दादासाहेबांचा उल्लेख हाेताे. भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श आणि कर्मवीर भाऊराव गायकवाड यांच्या विचारांचा वसा पुढे नेत दादासाहेबांनी (Dadasaheb Gawai) सकारात्मक सामाजिक परिवर्तनाला महत्व दिले हाेते.
त्यावेळीची परिस्थिती लक्षात घेता राजकीय पातळीवरून एकरूपतेचे कार्य करण्यासाठी त्यांनी माेठी चळवळ उभारली हाेती. त्यावेळी काँग्रेस व रिपाइं युती व्हावी अशी दादासाहेबांची इच्छा हाेती. परंतु पक्षातील काहींनी त्यास विराेध केला. त्यामुळे दादासाहेबांनी पुढील निवडणूकीची जबाबदारी कमलताई यांच्यावर साेपविली. त्यावेळी निवडणूक काळात सर्वत्र रिपाइंचे निळ्या टाेपी दिसत हाेत्या. पुढे युती न झाल्याने नुकसान झाले. त्यामुळे 1996 मध्ये काँग्रेस व रिपाइंमध्ये युती झाली. कमलताई यांनी राजकारणात युती किती महत्वाची असते ही बाब कार्यकर्त्यांनी पटवून दिली. दादासाहेबांनी त्यांच्यातील ही चांगली बाब ओळखली हाेती. दादासाहेबांच्या राजकीय याेजनांना पुढे नेण्यासाठी कमलताई यांनी माेठे परिश्रम घेतले. विपश्यना शिबिर व विपश्यनेसाठी त्या कार्य करीत आहेत. वृक्षाराेपणाची चळवळ देखील त्या राबवित असल्याचे त्यांनी सांगितले.
लग्नाच्या आठवणीला उजाळा
माजी आमदार बी.टी. देशमुख यांनी यावेळी दादासाहेब गवई (Dadasaheb Gawai) व कमलताई यांच्या लग्नाच्या आठवणींना उजाळा दिला. सभा आटाेपून दादासाहेब कमलताई यांच्या मूर्तीजापूर येथील घरी गेले हाेते. पहाटे पाेहाेचल्याने ताईर्ंनी त्यांच्या हाती दंत मंजनाचा डबा दिला. दादासाहेबांचे लग्न देखील जाहीर सभेप्रमाणे झाले. प्रचंड गर्दी लग्नात हाेती. दादासाहेबांच्या शब्द संपदेत कमलताई गवई यांनी भर टाकली असल्याचेही बी.टी. देशमुख म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा संदेश
कार्यक्रमादम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा व्हीडीओ चित्रीत असणारा संदेश दाखविण्यात आला. संदेशात फडणवीस यांनी दिवंगत दादासाहेब गवई व माझ्या वडीलांचा जवळचा संबंध असल्याचे सांगितले. कमलताई गवई यांचे सामाजिक कार्यात माेठे आहे. त्यांच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. त्यामुळे त्यांना दिर्घायुष्य लाभावे अशी सदीच्छा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केली.