नागपूर (Nagpur Metro) : ‘नागपूर मेट्रो’ आज नागपूरकरांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनली आहे. या (Nagpur Metro) मेट्रोने मोठ्या प्रमाणात दैनंदिन वाहतूक केली जाते. मात्र आज खापरी मार्गावर ही मेट्रो सुविधा तब्बल 1 तासांसाठी ठप्प झाली होती. मेट्रोची एक मार्गिका एक तासांसाठी बंद झाल्यामुळे जनसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागला.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओव्हर हेड पॉवर सप्लाय बंद पडल्याने बर्डी – खापरी दरम्यानची एक मार्गिका सायंकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत बंद पडली होती. काही काळापुरता मेट्रो प्रवासी वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. मात्र, (Nagpur Metro) एका मार्गिकेवरून आवागमन सुरू असल्याने प्रवाशांना कुठलाही त्रास झाला नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मेट्रोच्या तांत्रिक विभागाने तातडीने दखल घेत झालेला बिघाड दुरुस्त केला. साडे सात ते ८ वाजताच्या सुमारास ओव्हरहेड पॉवर सप्लाय सुरू झाल्याने बंद पडलेली मार्गिका पुन्हा सुरू झाली.