परभणी – गंगाखेड रोडवरील घटना
दैठणा (Daithana Accident) : परभणी-गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर दैठणा येथे मुख्य चौकात एका पादचार्याला स्कुटीने जोराची धडक दिली. हा (Daithana Accident) अपघात शनिवारी सकाळी घडला. अपघातात पादचार्याला आपला पाय गमवावा लागला आहे.
विना नंबरच्या स्कुटीने दिली धडक
या अपघाताविषयी अधिक माहिती अशी की, बाळासाहेब नारायणराव कच्छवे हे महामार्ग ओलांडत असताना भरधाव वेगातील विना क्रमांकाच्या स्कुटीने त्यांना (Daithana Accident) जोराची धडक दिली. पायावरुन वाहन गेल्याने पायाचे हाड मोडले. गावातील काही युवकांनी तातडीने खाजगी वाहनाच्या मदतीने बाळासाहेब यांना (Parbhani hospital) उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परभणी-गंगाखेड या मार्गावर दैठणा जवळ मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. एका बाजुला जिल्हा परिषद शाळा, पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र (Parbhani hospital) तर दुसर्या बाजुला धोंडी हे गाव असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यात भरधाव वेगाने धावणार्या वाहनांमुळे अपघातांची संख्या वाढली आहे. सदर रस्त्यावर गतीरोधक बसवावे, अशी मागणी होत आहे.