नवी दिल्ली (Dalai lama Security) : केंद्रीय गृह मंत्रालयाने तिबेटी आध्यात्मिक नेते दलाई लामा (Dalai lama) यांना झेड-श्रेणीची सुरक्षा प्रदान केली आहे. माहितीनुसार, गुप्तचर विभागाने दिलेल्या धोक्याच्या मूल्यांकन अहवालाच्या आधारे दलाई लामा यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. या वाढीव सुरक्षा व्यवस्थेअंतर्गत, (Dalai lama Security) दलाई लामा यांच्या सुरक्षेसाठी एकूण 33 सुरक्षा कर्मचारी उपस्थित राहतील.
दलाई लामा यांचे घर 24 तास सुरक्षा
हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथील दलाई लामा (Dalai lama) यांच्या निवासस्थानी सशस्त्र स्थिर रक्षक, 24 तास सुरक्षा (Z-class security) देणारे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी आणि शिफ्टमध्ये सशस्त्र एस्कॉर्ट कमांडो असतील. याव्यतिरिक्त, प्रशिक्षित ड्रायव्हर्स आणि पाळत ठेवणारे कर्मचारी त्यांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी (Z-class security) 24 तास कर्तव्यावर असतील.
दलाई लामा हे चिनी समर्थकांचे लक्ष्य
तिबेटी आध्यात्मिक (Tibetan spiritual leader) नेते दलाई लामा (Dalai lama) 1959 पासून भारतात राहत आहेत. भारत सरकार त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवते. त्याच वेळी, गेल्या काही दिवसांपासून गुप्तचर अहवालांमध्ये हे उघड होते की, चिनी समर्थक त्याच्यावर हल्ला करण्याचा कट रचत होते. हे लक्षात घेऊन सरकारने त्यांना (Z-class security) झेड श्रेणीची सुरक्षा प्रदान केली आहे.