मानोरा(Washim):- मानोरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मौजे उमरी बु येथे ग्राम पंचायत मार्फत सुरू असलेले सिमेंट रस्ता काम पहिले कोटींग न करताच सुरू असुन सदरील काम निकृष्ट दर्जाचे (Poor quality) करण्यात येत आहे. सदरील कामाची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी, असे तक्रार निवेदन गटविकास अधिकारी यांना दि. १३ जानेवारी रोजी संतोष सुभाष राठोड यांनी दिले आहे.
बिडीओ यांना तक्रार निवेदन
निवेदनात नमूद केले आहे की, मौजे उमरी बु येथे दलीत वस्ती सुधार योजनेअंतर्गत ग्रामपंचायत मार्फत सुरू असलेले सिमेंट रस्ता काम पहिले कोटिंग न टाकताच करण्यात येत आहे. तसेच रस्ता कामात वापरले जात असलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे वापरण्यात येत आहे. लाखो रुपयांच्या सिमेंट रस्ता कामात मोठा भ्रष्टाचार होत असल्याने सदरील कामाची चौकशी करण्यात यावी, तसेच चौकशी झाल्याशिवाय संबंधितांना देयके अदा करण्यात येवू नये, असे तक्रार निवेदन गटविकास अधिकाऱ्यांना तक्रारकर्ता संतोष राठोड यांनी दिला आहे.